शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी आगीत शंभर झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:59 IST

शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बघ्यांची गर्दी व अरूंद रस्त्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता.

मालेगाव : शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बघ्यांची गर्दी व अरूंद रस्त्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता.  शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. प्रारंभी लागलेल्या आगीने काहीवेळातच रौद्ररूप धारण केले होते. नागछाप झोपडपट्टीतील घरे अगदी जवळ असल्याने आग वाढत गेली. या आगीत सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच संसारोपयोगी वस्तू, धान्य, साहित्य जळून खाक झाले. आगीने धारण केलेल्या रौद्रारूपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या भागातील नागरिकांनी जीव मुठीत धरून घरातील सिलिंडर उचलून वस्तीबाहेर पळ काढला. या आगीमुळे सुमारे ९ घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच मालेगाव अग्निशमन दलाचे सात बंब, मनमाड, सटाणा, धुळे येथील बंबांनी सुमारे ५० फेऱ्या मारून तब्बल साडेतीन तास शर्थीॅच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी महापौर रशीद शेख, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अग्निशमन दल विभागप्रमुख संजय पवार आदिंनी धाव घेऊन आढावा घेतला. आयेशानगरचे पोलीस निरीक्षक मसूद खान, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड आदींसह पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवत अग्निशमन दलाच्या बंबांना रस्ता मोकळा करून दिला होता. महसूल विभागाकडून या आगीच्या नुकसानीची पंचनामे केले जाणार आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.टारगट तरुणांमुळे अग्निशमन बंबाला अडथळेरात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविण्याच्या कामात अधिकारी व कर्मचाºयांना अडचणी निर्माण होत होत्या. काही टारगट तरुणांमुळे अग्निशमन बंब घटनास्थळी नेण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते.

टॅग्स :Fairजत्रा