जोरण :बागलाण तालुक्यातील जोरण हे गाव ‘स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शंभर टक्के हगणदारीमुक्त झाले आहे. अभियाना अंतर्गत गावामध्ये शंभर टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत. विवेक धोत्रे, अशोक ब्रह्मन, हगणदारीमुक्त तक्ता क्रमांक २ कमिटी सदस्य तसेच स्वच्छता समन्वयक, पंचायत समिती, बागलाण येथिल वैभव पाटील , ग्रामसेवक विद्या बेडीस यांनी शौचालयांची पाहणी केली. यावेळी कमिटी सदस्य, ग्रामसेवक विद्या बेडीस, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र बिरारी, आरोग्यसेवक प्रमोद देशमुख, उपसरपंच सुभाष सावकार, किरण मोरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
जोरण शंभर टक्के हगणदारीमुक्त
By admin | Updated: July 26, 2016 22:37 IST