शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
2
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
3
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
4
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
5
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
6
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
7
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
8
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
9
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
10
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
11
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
12
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
13
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
14
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
16
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
17
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
18
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
19
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
20
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

मुक्या जनावरांचा चाऱ्यासाठी हंबरडा

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

दुष्काळात तेरावा : नांदगावच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; शेतकरी हतबल

नांदगाव : सगळ्याच प्रश्नाकडे तटस्थपणे बघणाऱ्या प्रशासनाने पिण्याच्या पाण्यापाठोपाठ आता जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असल्याच्या दावा आपल्या अहवालात दिल्याने आता जणू दुष्काळाची स्थिती नाही अशा थाटात नामनिराळे होण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने चारा-पाण्याची मागणी घेऊन आलेल्या गरजू शेतकऱ्यांना हताश होण्याची वेळ आली आहे. प्रशासन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी सब कुछ आलबेल असल्याची बतावणी करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. एरवी कागदी घोडे नाचविणारे प्रशासन पाणी चाऱ्याच्या मुद्द्यावरदेखील संवेदनशील नसल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळाची भीषण दाहकता समोर असताना केवळ सोपस्काराच्या भूमिकेत वावरताना धन्यता मानताना दिसत आहे. विशेष म्हणजे तालुक्यात चाऱ्याची जणू गरजच नसल्याचे दाखविताना ४१ हजार मेट्रिक टन चारा तालुक्यात उपलब्ध असून, तो ३६८ दिवस पुरेल असा तालुका कृषी कार्यालयाच्या व पशुधन विकास विभागाचे हवाल्याने असा अहवाल नांदगावच्या तहसीलदारांना दिला आहे, तर दुसरीकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यात ८६ हजार लहान मोठ्या जनावरांसाठी प्रतिमाह १४ हजार ९६३ मेट्रिक टन चारा सध्या १ लाख ४४ हजार मेट्रिक टन चारा असल्याचे म्हटले आहे. एकाच विषयावर असे परस्परविरोधी अहवाल असले तरी त्यात एक समानता आहे. ती म्हणजे तालुक्यात चारा उपलब्ध असल्याची. प्रत्यक्षात तालुक्यात चाऱ्याची काय अवस्था आहे हे नांदगावच्या तहसीलदाराकडे याबाबतीत नोंदविलेल्या मागणीवरून लक्षात यावे. तालुक्याच्या पानेवाडी, नागापूर, धोटाणे, कऱ्ही, जोंधळवाडी, अस्तगाव, शास्त्रीनगर यांसह विविध गावातील शंभरहून शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यापासूनच आपल्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याची मागणी नोंदविले मात्र शासकीय नियमाचा बागुलबुवा उभा करीत शेतकऱ्यांना अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाने त्यांना झुलते ठेवले आहे. सध्या मिळेल त्या ठिकाणाहून चारा आणावा लागत आहे. चारा आणि पाणीटंचाईने तोंड वर काढल्याने तालुक्यातील शेळ्या-मेंढ्यासह लहान-मोठ्या जनावरांचे हाल सुरू आहेत. पशुधन जगविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असला तरी मेंढपाळांसह पशुपालकांना चारा आणि पाण्याची सोय करताना नाकी नऊ आले आहे. तालुक्यातील चाऱ्याचे सर्व स्त्रोत संपले असून, अपवाद वगळता सर्वत्र विकतचा चारा घेऊनच जनावरे वाचविण्याची वेळ आली आहे. शेळ्या-मेंढ्यावगळता लहान जनावरांना प्रतिदिन साडेसात किलो चारा लागतो तर मोठ्या जनावरांना प्रतिदिन पंधरा ते वीस किलो चारा गरजेचा आहे. केवळ ८६ हजार लहानमोठ्या जनावरांचा विचार करता तालुक्यात दररोज १२ लाख ते तेरा लाख किलो इतका चारा अपेक्षित आहे. तर लहान जनावरांना प्रतिदिन ४० लिटर तर मोठ्या जनावरांना ८० लिटर इतके पाणी लागते पाण्याच्या या गणितीनुसार चाळीस ते पन्नास लाख लिटर पाणी हवे आहे प्रत्यक्षात सध्या माणसाना पाणी देतानाच खळखळ करणाऱ्या प्रशासन जनावरांना पाणी देताना नियमनाचा अडथळा आणताना दिसत आहे. त्यासाठी परिपत्रकांचा आधार घ्यावा लागत आहे. नांदगाव तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न किती उग्र बनला आहे याचा दाहक अनुभव तालुक्यातील भालूर येथे दिसून आला. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना आता जनावरांच्या चाऱ्यासोबत पाण्याची मागणी आता वाढू लागली आहे. भालूर गावात जनावरासाठी चक्क केळीचे कंद मागवून जनावरांची वैरणीची सोय करावी लागत असल्याचे बघावयास मिळत आहे. उसाचा भाव परवडत नसल्याने केळी कंद वापरण्याची वेळ भालूरचे शेतकरी गोविंद तळेकर यांच्यावर आली. तळेकर यांच्याकडे सध्या जेमतेम कडबा शिल्लक असल्याने चाळीसगावजवळील नागद (ता. कन्नड) येथून केळीचे कंद आणावे लागत आहे तर आज तहसीलदार गवांदे यांना संतप्त महिलांचा अनुभव घ्यावा लागला. जतपुरा रस्त्याकडील गवळी वस्तीवरच्या महिला तहसीलदार गवांदे यांना आमची जनावरे जगवायची कशी असा सवाल करीत जनावरे तहसील आवारात आणून सोडू असे सांगत होत्या. एकूणच तालुक्यातील मुक्या जनावरांचा हंबरडा कुणाला ऐकू जाणार असा प्रश्न मात्र उभा राहिला आहे. (वार्ताहर)