शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत महिलेच्या घरात शिरून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:11 IST

पंचवटी : परिसरात राहणा?्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोड गोरेवाडी येथे राहणा?्या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्राणायाम करताना वृध्दाचा मृत्यु

क्राईम डायरीपंचवटी : परिसरात राहणा?्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोड गोरेवाडी येथे राहणा?्या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी दुपारी संशयित आरोपी किरण दत्तात्रय पांडे, सोमेश किरण पांडे असे दोघेजण फिर्यादी महिलेच्या घरी दुपारच्या वेळी आले व ते फिर्यादीच्या नणंदबाईला शिवीगाळ करत असताना तिचे सासरे वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करत असतांना संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली तसेच एका संशयिताने फिर्यादी महिलेच्या जवळ येऊन तिच्या अंगावर हात टाकून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत पुन्हा आमच्या भांडणात पडल्या तर हात पाय तोडून टाकू अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तात्या वाघ तपास करत आहेत.तरूणावर धारदार शस्त्राने वारनाशिक : मित्रांसमवेत गप्पा मारत उभ्या असलेल्या एका तरूणावर दोघा संशयित हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सिडकोतील डीजीपीनगर-2 भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून पोलीसांनी दोघा संशयीतांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर आहेर उर्फ घा?्या व संजू साळुंके अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय उत्तम जाधव (२१ रा.दत्तनगर, चुंचाळे) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अक्षय गुरूवारी (दि.१) डीजीपीनगर भागात गेला होता. लॉर्डस बेकरी समोर तो आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत असताना ही घटना घडली. दोघा संशयीतांनी अक्षय यास गाठून कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली. यावेळी त्याने प्रतिकार केला असता दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत जाधव जखमी झाला असून पसार झालेल्या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्राणायाम करताना वृध्दाचा मृत्युनाशिक : प्राणायाम करीत असतांना बेशुध्द पडल्याने ६७ वर्षीय वृद्दाचा मृत्यु झाला. ही घटना गोल्फ क्लब मैदानावर घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.श्यामसुंदर हरिहर तालुकदार (६७ रा.न्युक्लेअर स्मार्ट सोसा.भाभानगर) असे मृत इसमाचे नाव आहे. तालुकदार शुक्रवारी (दि.२) नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गोल्फ क्लब मैदानावर गेले होेते. प्राणायाम करीत असतांना अचानक ते बेशुध्द पडल्याने ही घटना घडली. उपस्थीतांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले परंतू उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी