शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला नव्याने उभारलेल्या खाजगी कोविड सेंटरच्या इमारतीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:03 IST

चांदवड : येथील मुंबई आग्रारोडवरील मोदी इमारतीमध्ये नव्याने उभारलेल्या खाजगी कोविडसेंटरच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले

ठळक मुद्देआगीत प्लॉस्टीक कारखाना, फर्निचर दुकान, हॉटेलची लाखोची नुकसान

चांदवड : येथील मुंबई आग्रारोडवरील मोदी इमारतीमध्ये नव्याने उभारलेल्या खाजगी कोविडसेंटरच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले तर आजच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या खाजगी कोविड सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ.भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर व मान्यवरांच्या हस्ते होणार होते त्यापुर्वीच आगीचे नाट्य झाले.तर या कोविड सेंटरमध्ये सुमारे १० ते १२ रुग्ण होते मात्र सुदैवाने ते बचावले.

चांदवड मुंबई आग्रारोडवर मोदी कॉम्प्लेक्समध्ये खालच्या मजल्यावर गाळ्यामध्ये प्लॉस्टिकचा कारखाना, त्यांच्या शेजारी दत्तात्रेय गायकवाड यांचे मौनीगिरी फर्निचर , हॉटेल रन वे आहेत. दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्लॉस्टिक कारखान्यात अचानक आग लागली या आगीने रौद्ररुप धारण करीत शेजारील फर्निचरचे दुकान, हॉटल रनवे यांना भक्ष्यस्थानी घेतले परिसरातील नागरीकांनी आगीचे स्वरुप बघताच फर्निचर वाचविण्याचा प्रयत्न केला तर नव्याने होणाऱ्या कोविड सेंटरमध्ये वरच्या मजल्यावर काही कोविडचे रुग्ण दाखल झाले होते.

तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखुन तेथील रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खाजगी टॅकरवाले, सोमा कंपनीचा अग्नीशामक दल, मालेगाव, पिंपळगाव, मनमाड येथील अग्नीशामक दलाचे बंबानी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररुप एवढे धारण केले की, एका बाजुची आग कमी झाली की दुसºया बाजुला आग लागत असल्याचे चित्र दिसत होते.

घटनास्थळी कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेले चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी अभिजीत कदम व इतर मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर व पोलीस कर्मचारी , अग्नीशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आगीत नेमकी किती लाखाची नुकसान झाली व आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतFairजत्रा