शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नाशिककरांना  भरली हुडहुडी ; पारा घसरला : ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:22 IST

शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

नाशिक : शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.आठवडाभरापासून थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा रविवारी १३ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे संध्याकाळी व पहाटे हवेत गारवा निर्माण झाला होता. थंडीची तीव्रताही सोमवारी रात्रीपासून अचानकपणे वाढली. मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले.पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. आठवडाभरापूर्वी किमान तपमानाचा पारा १९ अंशांपर्यंत वर सरकल्याने नाशिककरांचे पंखे दिवसा-रात्री वेगाने फिरू लागले होते. वातानुकूलित यंत्रांचाही वापर नागरिकांकडून केला जाऊ लागला होता. कारण उष्मा जाणवत होता; मात्र पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती बदलली.काही खासगी शाळांची सुटी संपल्यामुळे सकाळी चिमुकल्यांना शाळेत सोडताना पालकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, टोपी, मफलर, जॅकेटचा वापर केला जात आहे. लहानगेही संपूर्णत: ‘पॅक’ होऊन शाळेत जाताना दिसून येत आहे. दूधविक्रेते, वर्तमानपत्र विक्रेत्यांसह ज्यूसविक्रेत्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे संध्याकाळी बाजारपेठांमध्ये लवकर शुकशुकाट दिसू लागला आहे.किमान तपमानाचा पारा जरी घसरत असला तरीदेखील कमाल तपमानाचा पारा अजूनही तिशीपारच असल्यामुळे सूर्योदयानंतर थंडीचा प्रभाव कमी होत असून सकाळी ८ वाजेनंतर थंडीची तीव्रता सुंपष्टात येत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNashikनाशिकTemperatureतापमान