शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांच्या कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:24 IST

जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून, या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून, या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आहे.या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसºया दिवशी शाळेत हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे जवळपास ४८ तासांच्या अविरत कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार, असा सवाल उपस्थित करीत शिक्षकांना निवडणुकीच्या दुसºया दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नसून निवडणुकीच्या जबाबदारीवर असलेल्या सर्व शिक्षकांना मंगळवारी शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे.निवडणूक आयोगाच्या धोरणाप्रमाणे बºयाचशा कर्मचाऱ्यांची नेमणूक त्यांच्या मुख्यालयापासूनच्या दूर असलेल्या तालुक्यांत करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया सोमवारी (दि.२९) आहे. परंतु सर्व कर्मचाºयांना नियमाप्रमाणे निवडणुकीच्या एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी (दि.२८) सकाळी ८ वाजेच्या आत नियुक्त तालुक्याच्या स्थळी पोहोचण्यासाठी रवाना व्हावे लागणार आहे. दुसºया दिवशी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर तालुका स्तरावर साहित्य जमा केल्यानंतर कर्मचारी तेथेच मुक्काम करतील किंवा काही कर्मचारी घरी जाण्यासाठी रवाना होतील. इतक्या उशिरा घरी जाण्यासाठी बस, गाडी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असते. कितीही प्रयत्न केला तरी कर्मचारी मंगळवारी (दि.३०) पहाटे किंवा सकाळी त्यांच्या मुख्यालयी लवकर पोहचू शकत नाही. सध्याच्या स्थितीत जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी ७.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत अशी आहे. या परिस्थितीत शिक्षक सलग ४८ तासांच्या कर्तव्यावरून परतून पुन्हा सकाळी ७ वाजता शाळेवर जाणे शक्य नाही.प्रशासनाकडून प्रतिसाद नाहीनिवडणुकीच्या कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांना मंगळवारी (दि.३०) कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी अर्थात रजा मंजूर करण्यात यावी व त्यासंबंधीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावे, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र शिक्षकांच्या मागणीला प्रशासनाकडून रविवारी सायंकाळपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षकांना निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा नियमितपणे आपल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र