शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या उच्चाटनासाठी घरोघरी ‘दुवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:48 IST

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धतीने नमाज, कुराण धर्मग्रंथाचे आबालवृद्धांनी पठण करत कोरोनासारख्या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ‘दुवा’ मागितली. शासनाच्या निर्बंधांचे पालन करत कुठल्याही मशिदींमध्ये सामूहिक सोहळा पार पडला नाही.

ठळक मुद्दे‘शब ए कद्र’ : समाजबांधवांकडून घरांमध्ये नमाज अन कुराण पठण

नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धतीने नमाज, कुराण धर्मग्रंथाचे आबालवृद्धांनी पठण करत कोरोनासारख्या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ‘दुवा’ मागितली. शासनाच्या निर्बंधांचे पालन करत कुठल्याही मशिदींमध्ये सामूहिक सोहळा पार पडला नाही.धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या ‘शब ए कद्र’ची मोठी रात्र शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.  मशिदींवर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प आदी भागातील मशिदींना रोशणाईने झळाळी प्राप्त झाल्याचे चित्र होते.दरम्यान, या रात्रीच्या औचित्यावर विविध भागांमध्ये शाळकरी चिमूकल्यांनीसुद्धा निर्जळी कडक उपवास केला.दरवर्षी रमजान पर्वाचा २६वा उपवास सोडल्यानंतर शब ए कद्र साजरी केली जाते. या रात्रीच्या औचित्यावर मशिदींमधून विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम होतात. समाजबांधव एकत्रितपणे कुराण पठण करतात आणि अल्लाहच्या दरबारी दुवा मागतात. तसेच मशिदीचे मौलवी, सेवेकरी (खादीम) यांचा विश्वस्तांकडून सत्कार केला जातो. कोरोनाचे सावट असल्याने हा सोहळा यंदाही कोणत्याही मशिदीत पार पडला नाही. धर्मगुरूंचे प्रवचनही झाले नाही.या रात्रीत धर्मग्रंथ कुराण पृथ्वीतलावर अवतरीत करण्यात आल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या रात्रीवर कोरोनाचे सावट राहिले. कोरोनाच्या साथीमुळे शासनाच्या वतीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कडक निर्बंधांमुळे या विशेष रात्रीलाही मशिदींमध्ये नमाजपठण झाले नसल्याचे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRamadanरमजान