शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस भरणारा अड्डा पोलिसांकडून उद््ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:54 IST

घरगुती वापराचा गॅस विविध चारचाकी वाहनांमध्ये भरून देणारा मोठा अड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद््ध्वस्त केला. या कारवाईत गॅस भरण्याच्या तीन इलेक्ट्रिक मशीनरीसह तब्बल १२५ भरलेले आणि २१ रिकामे असे १४६ सिलिंडर पोलिसांनी हस्तगत केले.

नाशिक : घरगुती वापराचा गॅस विविध चारचाकी वाहनांमध्ये भरून देणारा मोठा अड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद््ध्वस्त केला. या कारवाईत गॅस भरण्याच्या तीन इलेक्ट्रिक मशीनरीसह तब्बल १२५ भरलेले आणि २१ रिकामे असे १४६ सिलिंडर पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, पसार झालेल्या त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने केली.मोसिन शब्बीर खान (रा. म्हाडा कॉलनी, सामनगाव) व कवीराज अनुराज वाघेरे (रा.भारती मठ, सुभाषरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर फारूख (रा. नाथ इस्टेट, महाराजा बसथांबामागे लॅमरोड) व सना हे दोघे संशयित पसार झाले आहेत. फारूख याच्या लॅमरोड भागातील घरात संशयित मोसिन खान आणि कवीराज वाघेरे हे दोघे हा अड्डा चालवित होते. अवैध धंदेविरोधी पथकास या अड्ड्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सहायक निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने नाशिकरोड पुरवठा निरीक्षक आनंद गुप्ता यांच्यासमवेत छापा टाकला असता तेथे मारुती व्हॅन (एमएच १५ सीडी ९७४४) या वाहनात घरगुती सिलिंडरमधून बेकायदा गॅस भरताना दोघे रंगेहात पोलिसांच्या हाती लागले. संशयितांच्या ताब्यात एचपी कंपनीचे ९८, भारत गॅस कंपनीचे ७ व अन्य २० असे १२५ भरलेले गॅससिलिंडर तसेच भारतचे व्यावसायिक वापराचे २१ रिकामे असे १४६ सिलिंडर मिळून आले. घटनास्थळावर गॅस भरण्याचे तीन इलेक्ट्रिक मशीन आणि दोन वजनकाटे असा सुमारे ३ लाख ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर सापडल्यामुळे शहरातील घरगुती गॅस तुटवडाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी