शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:46 IST

पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर अस्वच्छ शहर’ म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप संतप्त लोकप्रतिनिधींनी करून पंचवटी प्रभागाच्या बैठकीत घंटागाडी कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या तक्रारी : पंचवटी प्रभाग बैठकीत टीका; नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

पंचवटी : संपूर्ण पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर अस्वच्छ शहर’ म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप संतप्त लोकप्रतिनिधींनी करून पंचवटी प्रभागाच्या बैठकीत घंटागाडी कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहील याबाबत काळजी घेण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी यासाठी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.पंचवटी प्रभाग समितीची बैठक गुरुवारी सभापती सुनीता पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या प्रारंभी उपस्थित लोकप्रतिनिधींनी पंचवटी प्रभागात गेल्या पंधरवड्यापासून घंटागाडी येत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागत आहे. मनपा घंटागाडीच्या नियोजनाबाबत कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप केला. पंचवटी विभागातील एक ते सहा प्रभागात अनेक ठिकाणच्या भागात १० ते १२ दिवसांपासून घंटागाडी फिरकतच नसल्याची तक्रार नगरसेवक पूनम मोगरे, रुची कुंभारकर, शीतल माळोदे यांनी केली. घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील संबंधित दखल घेत नसल्याची खंत पंचवटी घनकचरा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली. डिझेल नाही, घंटागाड्या नादुरुस्त असल्याबाबत संबंधित ठेकेदाराकडून सांगितले जात असल्याने घंटागाडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला असला तरी जुन्या ठेकेदारामार्फत कचरा संकलन करण्याचे काम केले जात आहे. वॉटर ग्रेस नामक कंपनीला नव्याने ठेका दिला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कुठलेही नियोजन नसल्याने जागोजागी कचरा पडून आहे, अशी तक्रार कमलेश बोडके यांनी केली. घंटागाड्या ठेकेदाराच्या तरी त्या मनपाच्या जागेत उभ्या केल्या जातात असल्याची तक्रार मच्छिंद्र सानप यांनी केली.मखमलाबादला घंटागाडी येतच नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागतो, असे पुंडलिक खोडे यांनी सांगितले. पालिकेने परिसरातील जुने विद्युत पोल फिटिंग बदलण्याचे काम चालू आहे, मात्र विद्युत विभाग नगरसेवकांचे चेहरे बघून फिटिंग बसवण्याचे काम करत आहे. विद्युत विभाग काही ठराविक नगरसेवकांच्या भागात जास्त फिटिंग, नवख्या नगरसेवकांच्या प्रभागात कमी फिटिंग बसवित असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. यावेळी दोन विषयांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेत नगरसेवक विमल पाटील, नंदिनी बोडके, प्रियंका माने, अनिल वाघ, महेंद्र आव्हाड, आर. एस. पाटील, संजय दराडे, वसंत ढुमसे, अनिल गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता.नगरसेवकांत शाब्दिक चकमकपंचवटी प्रभागाच्या बैठकीत विद्युत विभागातील तक्रारीवरून काही नगरसेवकांनी संबंधित अधिकाºयाला एलईडी फिटिंग तसेच जुने पोल बदलण्याच्या कारणावरून कोंडीत पकडले. त्याचवेळी प्रभागातीलच दुसºया अन्य नगरसेवकाने संबंधित अधिकाºयाची बाजू घेत ते कशा प्रकारे चांगले काम करतात याचा खुलासा केला. त्यावेळी तक्रार करणाºया नगरसेवकांनी आम्ही कोणाला दोष देत नाही ते काय काम करतात आम्हाला माहीत आहे. आम्ही त्यांना वाईट म्हणत नाही तर आम्ही केवळ प्रभागातील कामकाजाबाबत विचारणा केली, असे सांगितल्याने दोघा महिला नगरसेवकांत किरकोळ शाब्दिक चकमक झाली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका