घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:23 PM2020-01-30T23:23:49+5:302020-01-31T00:46:31+5:30

पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर अस्वच्छ शहर’ म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप संतप्त लोकप्रतिनिधींनी करून पंचवटी प्रभागाच्या बैठकीत घंटागाडी कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

Hours were planned | घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले

घंटागाडीबाबत विभागीय अधिकारी आर. एस. पाटील यांना निवेदन देताना नगरसेवक पूनम मोगरे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप.

Next
ठळक मुद्देनगरसेवकांच्या तक्रारी : पंचवटी प्रभाग बैठकीत टीका; नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

पंचवटी : संपूर्ण पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर अस्वच्छ शहर’ म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप संतप्त लोकप्रतिनिधींनी करून पंचवटी प्रभागाच्या बैठकीत घंटागाडी कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहील याबाबत काळजी घेण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी यासाठी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
पंचवटी प्रभाग समितीची बैठक गुरुवारी सभापती सुनीता पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या प्रारंभी उपस्थित लोकप्रतिनिधींनी पंचवटी प्रभागात गेल्या पंधरवड्यापासून घंटागाडी येत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागत आहे. मनपा घंटागाडीच्या नियोजनाबाबत कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप केला. पंचवटी विभागातील एक ते सहा प्रभागात अनेक ठिकाणच्या भागात १० ते १२ दिवसांपासून घंटागाडी फिरकतच नसल्याची तक्रार नगरसेवक पूनम मोगरे, रुची कुंभारकर, शीतल माळोदे यांनी केली. घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील संबंधित दखल घेत नसल्याची खंत पंचवटी घनकचरा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली. डिझेल नाही, घंटागाड्या नादुरुस्त असल्याबाबत संबंधित ठेकेदाराकडून सांगितले जात असल्याने घंटागाडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला असला तरी जुन्या ठेकेदारामार्फत कचरा संकलन करण्याचे काम केले जात आहे. वॉटर ग्रेस नामक कंपनीला नव्याने ठेका दिला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कुठलेही नियोजन नसल्याने जागोजागी कचरा पडून आहे, अशी तक्रार कमलेश बोडके यांनी केली. घंटागाड्या ठेकेदाराच्या तरी त्या मनपाच्या जागेत उभ्या केल्या जातात असल्याची तक्रार मच्छिंद्र सानप यांनी केली.
मखमलाबादला घंटागाडी येतच नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागतो, असे पुंडलिक खोडे यांनी सांगितले. पालिकेने परिसरातील जुने विद्युत पोल फिटिंग बदलण्याचे काम चालू आहे, मात्र विद्युत विभाग नगरसेवकांचे चेहरे बघून फिटिंग बसवण्याचे काम करत आहे. विद्युत विभाग काही ठराविक नगरसेवकांच्या भागात जास्त फिटिंग, नवख्या नगरसेवकांच्या प्रभागात कमी फिटिंग बसवित असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. यावेळी दोन विषयांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेत नगरसेवक विमल पाटील, नंदिनी बोडके, प्रियंका माने, अनिल वाघ, महेंद्र आव्हाड, आर. एस. पाटील, संजय दराडे, वसंत ढुमसे, अनिल गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता.

नगरसेवकांत शाब्दिक चकमक
पंचवटी प्रभागाच्या बैठकीत विद्युत विभागातील तक्रारीवरून काही नगरसेवकांनी संबंधित अधिकाºयाला एलईडी फिटिंग तसेच जुने पोल बदलण्याच्या कारणावरून कोंडीत पकडले. त्याचवेळी प्रभागातीलच दुसºया अन्य नगरसेवकाने संबंधित अधिकाºयाची बाजू घेत ते कशा प्रकारे चांगले काम करतात याचा खुलासा केला. त्यावेळी तक्रार करणाºया नगरसेवकांनी आम्ही कोणाला दोष देत नाही ते काय काम करतात आम्हाला माहीत आहे. आम्ही त्यांना वाईट म्हणत नाही तर आम्ही केवळ प्रभागातील कामकाजाबाबत विचारणा केली, असे सांगितल्याने दोघा महिला नगरसेवकांत किरकोळ शाब्दिक चकमक झाली.

Web Title: Hours were planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.