शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावने कोरोना आणला नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:50 IST

मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात सध्या केवळ ३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मालेगाव ग्रामीण व महापालिका क्षेत्रात १८४ रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावने आता कोरोना नियंत्रणात आणला आहे.

ठळक मुद्देदिलासादायक : स्थानिक प्रशासनाची मेहनत, नागरिकांचे सहकार्य

स्थानिक प्रशासनाची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या ८ एप्रिल रोजी कोरोनाचे ५ रुग्ण आढळून आले होते. यात दोघांचा मृत्यू झाला. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ झाली. तब्बल ९९ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यामुळे मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. १८५ प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले होते. प्रशासनाने कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करून प्रशासनाप्रति विश्वास निर्माण केला. कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी पद्धतीने उपचार करण्यात आले. पॅरा मेडिकल स्टाप उपलब्ध करून देण्यात आला. बाहेरगावच्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून मालेगाव शहरात सध्या केवळ ३९ रुग्ण आहेत. मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये २३ रुग्ण आहेत. यापैकी १५ रुग्ण मालेगावबाहेरील आहेत, तर सहारा कोविड सेंटरमध्ये १६ रुग्ण आहेत. यापैकी ५ बाहेरचे असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मालेगाव ग्रामीणमध्ये १२, तर महापालिका क्षेत्रात १७२ रुग्ण आहेत; मात्र त्यांना गंभीर स्वरूपाचे लक्षणे नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. दिवाळी काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. या गर्दीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रशासनाने तशी तयारीदेखील केली होती; मात्र दिवाळी होऊन तब्बल महिना उलटला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने मालेगाववासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दिनांक - कोरोनाबाधितांची संख्या८ एप्रिल २०२० - ०५८ मे २०२० - ४१७८८ जून २०२० - ८५४८ जुलै २०२० - ११०५८ ऑगस्ट २०२० - १४९०८ सप्टेंबर २०२० - ११३८८ ऑक्टोबर २०२० - ४३४८ नोव्हेंबर २०२० - १२६८ डिसेंबर २०२० - १०१

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या