निफाड : नगरपंचायतीच्या वतीने शहरात प्लॅस्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले असून, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये वस्तू दिल्यास दंड आकारण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.हॉटेलमध्ये प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्यानंतर पथकाने दोन हॉटेलचालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.निफाड शहरातील शांतीनगर येथे शांतीनगर कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी होणारा रावणदहनाचा कार्यक्रम याहीवर्षी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रावणदहन बघण्यासाठी निफाड शहरातील व परिसरातील गावांमधील नागरिक मोठी गर्दी केली होती.कापडी पिशव्यांचे वाटपनिफाड नगरपंचायतीतर्फे महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत निफाड शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीतर्फे दसºयाच्या दिवशी राजीव गांधीनगर येथे सोने लुटण्याच्या कार्यक्रमात पुरुष, महिलांना भाग्यश्री सोनवणे यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी कापडी पिशव्याचा वापर करण्याबाबत सोनवणे यांनी माहिती दिली.
हॉटेलचालकांकडून दहा हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:17 IST
निफाड : नगरपंचायतीच्या वतीने शहरात प्लॅस्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले असून, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये वस्तू दिल्यास दंड आकारण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
हॉटेलचालकांकडून दहा हजारांचा दंड वसूल
ठळक मुद्देआपट्याऐवजी कापडी पिशव्यांचे वाटप