सायखेडा : माशांची भाजी बनवून न दिल्याने व हॉटेलमध्ये प्रवेश न दिल्या कारणाने भुसे येथे हॉटेल व्यवस्थापकास तिघांनी लाकडी दांडक्याने व गजाने मारहाण करत जखमी केले.निफाड तालुक्यातील भुसे येथे हॉटेल झोपडी येथे मंगळवारी (दि.१) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास संशयित भारत बाळू जगताप, सोमनाथ कारभारी सानप, निखिल नाईक (सर्व रा. खानगाव थडी) यांनी हॉटेल समोर येऊन जोराने आवाज देऊन माशांची भाजी बनवून जेवण द्या, असे सांगितले. हॉटेल व्यवस्थापक किरण नथू पाटील याने त्यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हॉटेलमध्ये बसण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी किरण पाटील व साक्षीदार बिपीन चौधरी यांना मारहाण व शिवीगाळ केली असल्याची तक्रार सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. सी. तांबे हे करत आहेत.
हॉटेल व्यवस्थापकास टोळक्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 00:16 IST
सायखेडा : माशांची भाजी बनवून न दिल्याने व हॉटेलमध्ये प्रवेश न दिल्या कारणाने भुसे येथे हॉटेल व्यवस्थापकास तिघांनी लाकडी दांडक्याने व गजाने मारहाण करत जखमी केले.
हॉटेल व्यवस्थापकास टोळक्याकडून मारहाण
ठळक मुद्देमारहाण व शिवीगाळ केली