शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'हॉटेल बंद'चा मनपाच्या वीजनिर्मितीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 01:36 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत असल्याने अवघे २५ ते३० युनिट्सीची वीजनिर्मिती होत आहे. 

ठळक मुद्देलॉकडाऊन : अवघे २५ ते ३० युनिट्सची होते निर्मिती

नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत असल्याने अवघे २५ ते३० युनिट्सीची वीजनिर्मिती होत आहे. महापालिकेच्या वतीने पाथर्डी येथील खतप्रकल्पाच्या जागेतच हा वीजनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. जर्मन सरकारच्या मदतीने शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन यावर दहा वर्षांपूर्वी कृती आराखडा तयार करण्यातआला होता. त्यातील सूचनेनुसार हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे.शहरातील हॉटेल्समधील ग्रीन कचरा याठिकाणी आणला जातो आणि शहरातील सार्वजनिक मलजल याठिकाणी आणून त्यातून मिथेन वायुच्या माध्यामतून वीजनिर्मिती केली जाते. ही विज निर्मिती झाल्यानंतर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठविली जाते. तसेच काही प्रमाणात विजेचा वापर केला जातो.महावितरणला विकलेल्या विजेच्या माध्यमातून मनाच्या विजेच्या बिलाचेसमायोजन केले जाते. महापालिकेच्या या पथदर्शी प्रकल्पात दररोज सुमारेसाडे चारशे ते पाचशे युनीटस विज तयार होते.मात्र, आता ते  प्रमाण प्रचंडघटले आहे.  कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस पासून सर्व उद्योगबंद करण्यात आले आहेत.  यात हॉटेल्सचा समावेश आहे. आज मिशेन बिगेन सुरूअसताना देखील हॉटेल्सला केवळ पार्सल सेवेची परवानगी आहे. लॉजींगसाठी केवळ२५ टक्केच खोल्या देऊ शकतात. या सर्वाचा हॉटेलच्या कचरा निर्माण होण्यावरपरीणाम झाला आहे. हॉटेल वेस्ट (कचरा) मिळत नसल्याने वीज निर्मितीवर देखीलपरिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.फर्नेश आॅइल निर्मितीत घटलॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद असल्याने महापालिकेच्या वीजनिर्मितीला त्याचा फटका बसला आहे. परंतु त्याचबरोबर सध्या अपेक्षित प्लॅस्टिक मिळत नसल्याने फर्नेश आॅईल निर्मितीतदेखील घट झाली आहे. त्यामुळे त्याचेही उत्पादन कमी झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाelectricityवीज