नाशिक : हॉस्टेलचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने २७ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली आहे़ बिपीनसिंग अशोकसिंग चव्हाण (२३, स्वस्तिक मेन्शन बॉईज होस्टेल, पौर्णिमा बसस्टॉप, द्वारका) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी होस्टेलचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला़ कार्यालयात असलेला २७ हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप व मोबाइल घेऊन ते पसार झाले़ या प्रकरणी पोलीस हवालदार धात्रक अधिक तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)
वसतिगृहातील लॅपटॉपची चोरी
By admin | Updated: May 20, 2014 00:25 IST