शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय निवडीसाठीची माहिती गुगल डॅशबोर्डवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:31 IST

नाशिक : ज्या नागरिकांना आपल्या तब्येतीबाबत काही शंका वाटल्यास त्या नागरिकाला जवळपासची कोविड तपासणी करू शकणारी मान्यताप्राप्त लॅब सुविधा कुठे मिळू शकेल? शासकीय, मनपा किंवा मान्यताप्राप्त कोविडच्या खासगी रुग्णालयात जायचे असेल तर जवळचे हॉस्पिटल कुठले? तिथे बेड उपलब्ध आहेत का? कोणकोणत्या सुविधा आहेत? या सर्व बाबींची माहिती नाशिककरांना मिळू शकणार आहे.

ठळक मुद्देउपयुक्त तंत्र : कोरोनाचा संशय असणाऱ्या नागरिकांना स्वत:च हॉस्पिटल निवडण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ज्या नागरिकांना आपल्या तब्येतीबाबत काही शंका वाटल्यास त्या नागरिकाला जवळपासची कोविड तपासणी करू शकणारी मान्यताप्राप्त लॅब सुविधा कुठे मिळू शकेल? शासकीय, मनपा किंवा मान्यताप्राप्त कोविडच्या खासगी रुग्णालयात जायचे असेल तर जवळचे हॉस्पिटल कुठले? तिथे बेड उपलब्ध आहेत का? कोणकोणत्या सुविधा आहेत? या सर्व बाबींची माहिती नाशिककरांना मिळू शकणार आहे.नाशिकमधील सर्व रुग्णालयांची माहिती संकलित करून अशा स्वरुपाचे ‘गुगल आॅक्युपन्सी डॅशबोर्ड’ तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून, नागरिकांना पुढील आठवड्यापासून ही सुविधा उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.कोणत्याही कुटुंबातील माणसाला घशाची किंवा सर्दी-तापाची समस्या जाणवू लागली की सर्वप्रथम त्याला कोरोनाचा संशय मनात येतो. आपल्यामुळे आपल्याच कुटुंबातील नागरिकांना बाधा होऊ नये, हाच पहिला विचार नागरिकांच्या मनात येतो. अशावेळी कोरोनाची चाचणी करणारी शासकीय, मनपा किंवा खासगी मान्यताप्राप्त लॅब कुठली, याबाबतची माहिती या अनोख्या डॅशबोर्डद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच थेट रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची असल्यास शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या उपलब्धतेबाबत तसेच तेथील सुविधांबाबतही सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या रुग्णालयांना महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना लागू आहे, अशा ठिकाणी रु ग्णभरती झाल्यास त्या रुग्णाचे बिल कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर जीवनदायी योजनेमधून शासकीय दरानुसार प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा फुले योजनेंतर्गत हॉस्पिटल्सची यादी प्रसिद्ध शासन निर्देशानुसार कोविड मान्यताप्राप्त खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रु ग्णावर उपचार करण्यासाठी आकारावयाचे दर निर्देशित करण्यात आलेले आहेत. रु ग्णाचे बिल करताना त्या बिलाची आकारणी शासन निर्णयानुसार करण्याचे आदेश खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. सध्या संबंधित रु ग्णालयांची माहिती व त्यांचे संपर्क क्र मांक मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत हॉस्पिटल्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.रुग्णालयांबाबतची माहिती संकलित करून तेथील बेड, सुविधांची माहिती अपडेट करून देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसांत गुगलवरून बेड आॅक्युपन्सी डॅशबोर्डवर ही माहिती मिळू शकणार आहे. - डॉ. आवेश पलोड,वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका