शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कुंभनगरीत रामनामाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:58 IST

संसदेत कायदा करून आयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर १३ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथून स्वामी श्री. कृष्णानंद सरस्वती आणि शक्ती शांतानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात शुभारंभ झालेली श्री रामराज्य रथयात्रेचे सोमवारी (दि.२६) सायंकाळी नाशिकमध्ये आगमन झाले असून, विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी श्री रामराज्य रथयात्रेचे शहरात स्वागत केले.

ठळक मुद्दे असा होणार रथयात्रेचा प्रवासमिरवणूक मार्गहिंदूंनी संघटित होण्याची गरज

नाशिक : संसदेत कायदा करून आयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर १३ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथून स्वामी श्री. कृष्णानंद सरस्वती आणि शक्ती शांतानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात शुभारंभ झालेली श्री रामराज्य रथयात्रेचे सोमवारी (दि.२६) सायंकाळी नाशिकमध्ये आगमन झाले असून, विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी श्री रामराज्य रथयात्रेचे शहरात स्वागत केले. औरंगाबादमधून प्रस्थान झाल्यानंतर श्री रामराज्य रथयात्रा श्री क्षेत्र शिर्डी, सिन्नर, शिंदे पळसे, नाशिकरोडमार्गे नाशिक येथे पोहोचली. या रथाचे महापौर रंजना भानसी, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, नगरसेवक दिनकर पाटील, अनिल भालेराव, चेतन ढेरगे, हेमंत निखाडे, उदय थेटे, जतेंद्र दीक्षित, गोविंदराव मुळे, विनोद थोरात, एकनाथ शेटे, गणेश सपकाळ, चंदन भास्कर, प्रवीण जाधव, हर्षल साळुंके आदींसह स्वामी नरेंद्राचार्य महाराज मठ, इस्कॉन मंदिर ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आसाराम बापू आश्रम भक्तगण विविध हिंदुत्ववादी संघटना व धार्मिक मठ तथा संस्थांच्या प्रतिनिधींनी सारडा सर्कल परिसरात स्वागत केले. स्वागत सोहळ्यानंतर शहरातील पारंपरिक मार्गाने श्री रामरथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहर व परिसरातील साधू-संत, महंतांचे व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले.रामराज्य रथ हा अयोध्यायेथील संकल्पित श्रीराम मंदिराची प्रतिकृती असून, रथात श्रीराम, सीता, हनुमान यांच्या मूर्ती व नंदिग्राम येथील श्रीराम पादुका, श्रीलंका येथून आणलेल्या माता सीता चुडमणी, रामेश्वरमहून आणलेला ध्वज आणि कर्नाटकच्या कोल्लूर येथील मुकाम्बिका देवी मंदिर अखंड ज्योती स्थापित आहे.असा होणार रथयात्रेचा प्रवासअयोध्येतून १३ फेब्रुवारीला निघालेली श्री रामराज्य रथयात्रा नंदिग्राम, वाराणसी, अलाहाबाद, चित्रकु ट, छतरपूर, सागर, भोपाल, उज्जैन, इंदोर, ओंकारेश्वर, इच्छापूर, चिखली, औरंगाबादनंतर शिर्डीमार्गे नाशिकमध्ये दाखल झाली आहे. ही रथयात्रा नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार असून, त्यानंतर रामगिरी, नारायणपूर, गोंदवले, पंढरपूर, विजापूर, कोप्पल, किशकिंधा, चित्रदुर्ग, बंगळुरू, मानंतवाडी, कन्नूर, कोझीकोड, मेलाट्टूर, पलक्कड, एरनाकुलम, कोट्टयम, पत्तनंचिटा, पुनलूर, मदुराईमार्गे रामेश्वरम येथे पोहोचणार असून, कन्याकुमारी, नागरकोयिल तिरुअनंतपूरम या परिसरातही श्रीराम रथयात्रा काढली जाणार आहे.मिरवणूक मार्गसारडा सर्कल येथे श्री रामराज्य रथाचे स्वागत केल्यानंतर भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, दहीपूल, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा या पारंपरिक मिरवणूक मार्गाने रथयात्रा गंगाघाट येथे पोहचली. मुक्तेश्वर महादेव पटांगणावर खंडेराव कुंड परिसरात धर्मसभा घेण्यात आली. याठिकाणी सायंकाळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.हिंदूंनी संघटित होण्याची गरजदेशातील हिंदू समाज वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेला असून, काही लोक राजकीय स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत आयोध्येत राममंदिर होऊ शकले नाही. परंतु, २०१९ पर्यंत राममंदिर उभे राहणार असून, त्यासाठी हिंदू धर्मातील सर्व घटक ांनी संघटित होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत आचार्य जितेंद्र महाराज यांनी व्यक्त केले. मुक्तेश्वर महादेव पटांगणावर आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, महंत किशोरदास शास्त्री, सागरनंद महाराज, बिंदू महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :Nashikनाशिक