शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्याला पावसाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 22:55 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असमाधानकारक झाला असून, ओझरखेड धरणात अत्यल्प, तर तीसगाव धरणात अल्प जलसाठा, अशी स्थिती असल्याने या भागातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपुणेगाव प्रकल्पात अत्यल्पसाठा

वणी : दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असमाधानकारक झाला असून, ओझरखेड धरणात अत्यल्प, तर तीसगाव धरणात अल्प जलसाठा, अशी स्थिती असल्याने या भागातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यात करंजवण, पुणेगाव, वाघाड, पालखेड या धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची प्रतीक्षा आहे. काही धरणांमध्ये तुलनात्मक कमी जलसाठा आहे. दरम्यान, ओझरखेड धरणात या धरणांच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा, तर तीसगाव धरणात अल्प साठा आहे. वणी- दिंडोरी रस्त्यावरील वणीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित आहे. वणी शहराला या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. लखमापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाणीपुरवठा नियमित होतो, तसेच पाणी वापर संस्था या धरणातील पाण्याचा वापर करतात. सप्तशृंग गडावरील पर्वतरांगांतील पावसाचे काही भागातील पाणी, तसेच पायथ्याशी असलेल्या नद्या, नाले, आहिवंतवाडी, भातोडे व परिसरातील भूभागावरील नद्या, नाले, ओहोळ, तसेच ओझरखेड धरणात विविध स्रोतांद्वारे जाणारे पाणी, तसेच वणी भागातील देवनदी यातून पावसाचे पाणी प्रामुख्याने धरणात जाते. मात्र, दमदार व जोमदार पावसाची व अखंडित पडणाऱ्या मोठ्या पावसाची गरज आहे. जेणेकरून धरणातील जलसाठ्याच्या पातळीत वाढ होईल. दरम्यान, पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील जलसाठा ओझरखेड धरणात सोडण्यात येतो. तेव्हा ओझरखेड धरण भरते, असा प्रतिवर्षीचा अनुभव आहे.पुणेगाव प्रकल्पात अत्यल्पसाठासद्य:स्थितीत पुणेगाव धरणात अत्यल्प जलसाठा आहे. त्यात मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात जाण्यासाठीच्या पर्यायी व्यवस्थेमुळे पुणेगाव धरण लवकर भरून ओझरखेड धरण भरण्यासाठीच्या आशा जिवंत आहेत. साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अंतिम सत्रापासून ओझरखेड धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा येवला व लगतचे तालुके करतात. कारण त्यावेळी शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ओझरखेड धरणावर पाणीपुरवठ्याचा प्रचंड ताण पडतो, तसेच दिंडोरी शहरासाठी पाणीपुरवठ्याचे काम या धरणातून करण्यासाठीच्या नियोजनाचा विचार करता ओझरखेड धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती