येवला : येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान माणुसकी फाउण्डेशनच्या वतीने करण्यात आला.आरोग्यसेवेचा कणा असणार्या सर्व परिचारिकांचा आंतरराष्ट्रीय नर्स डेच्या निमित्ताने माणुसकी फाउण्डेशनचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांचा बहुपयोगी स्कार्फ भेट देऊन तहसीलदार प्रमोद हिले, नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरद कातकडे, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, अल्केश कासलीवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संगीता साबळे, नगरसेवक सचिन मोरे, गणेश गायकवाड, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, मयूर मेघराज, मनोज दिवटे, योगेश तक्ते आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
येवल्यात परिचारिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 01:00 IST
येवला : येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान माणुसकी फाउण्डेशनच्या वतीने करण्यात आला.
येवल्यात परिचारिकांचा सन्मान
ठळक मुद्देसर्व परिचारिकांचा बहुपयोगी स्कार्फ भेट