शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अलंगुण शाळेत गुणवंत शिक्षकाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:21 IST

अलंगुण : राज्य शिक्षक सेना व राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार येथील शहीद भगतसिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण (ता.सुरगाणा) या शाळेतील शिक्षक आर. डी. चौधरी यांचा भगूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिक्षक सेनेचे उपजिल्हाप्रमुख संग्राम करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील व्यक्तींना सलग सहा वर्षांपासून दिला जात असून, सदर पुरस्कार

अलंगुण : राज्य शिक्षक सेना व राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार येथील शहीद भगतसिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण (ता.सुरगाणा) या शाळेतील शिक्षक आर. डी. चौधरी यांचा भगूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिक्षक सेनेचे उपजिल्हाप्रमुख संग्राम करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदरचा पुरस्कार सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील व्यक्तींना सलग सहा वर्षांपासून दिला जात असून, सदर पुरस्कार राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन निस्वार्थी व प्रामाणिक व्यक्तींची निवड प्रस्ताव न मागविता प्रत्यक्ष केली जाते, अशी माहिती करंजकर यांनी आपल्या मनोगतात दिली. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते आर. एच. गांगुर्डे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थासंचालक हिरामण गावित, खजिनदार पांडुरंग भोये, सुनील करंजकर, अनिल करंजकर, देवीदास करंजकर, दौलत करंजकर, स्कूल कमिटी अध्यक्ष वसंतराव बागुल, प्राचार्य आर. के. मोरे, के. एल. वाकचौरे, मुख्याध्यापक व्ही. जे. जाधव आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थित होते. यादरम्यान संस्थासंचालक व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बी. के. जाधव यांनी मानले. 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक