शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

निस्वार्थ पत्रकारिता सेवाकर्माचा सन्मान : श्रीकांत पुर्णपात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:34 IST

मराठी पत्रकारितेतील ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.६) सर्वत्र  पत्रकारिता दिन म्हणून साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकारिता म्हटलं की लोकशाही जीवंत ठेवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण‘जीवन संजीवनी’चे प्रात्याक्षिकएकूण १८ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले

नाशिक :पत्रकारिता म्हटलं की लोकशाही जीवंत ठेवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण आलेच. सत्त्यनिष्ठा या एकमेव निकषावर आधारित  व्रतस्थ सेवाकर्माचे शिवधनुष्य पेलत अनेकदा पाणउतारा सहन करत आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पत्रकारांच्या निस्वार्थ सेवाकार्याचा वैद्यकिय पेशा जोपासणा-या सेवाव्रतींकडून करण्यात आलेला गौरव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉक्टर कवी श्रीकांत पुर्णपात्रे यांनी केले.मराठी पत्रकारितेतील ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.६) सर्वत्र  पत्रकारिता दिन म्हणून साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिक शाखेच्या वतीने (आयएमए) शहरातील प्रत्येक दैनिकामधील दोन पत्रकार असे एकूण १८ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून पुर्णपात्रे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, भुलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सरला सोहंदानी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर उपस्थित होते.यावेळी पुर्णपात्रे म्हणाले, पत्रकारिता आणि वैद्यकिय सेवाव्रत जपणा-या व्रतस्थींना दैनंदिन सेवाकार्य बजावताना येणा-या अडचणी व आव्हानांचा सामना करावाच लागतो. आपल्या स्वत:ची कुटुंबाची पर्वा न करता ही मंडळी केवळ जनतेची पर्वा करत आपले सेवाकार्य पार पाडत असतात.वैद्यकीय क्षेत्रासाठीची कडक धोरणे, टीकाटिपण्णी, रोष, अवहेलनांसारख्या संकटांना या क्षेत्रात काम करणारे पेशाने डॉक्टर असलेल्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवमान, अवहेलना, पाणउतारा एवढ्यावरच न थांबता थेट पत्रकारांसह डॉक्टरांनाही अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागते, हे समाजाचं दुर्दैवच म्हणावे लागेल, कारण हे दोन्ही घटक केवळ समाजाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत असतात, हे विसरून चालणार नाही, असेही पुर्णपात्रे यांनी यावेळी नमुद केले. त्यांनी भाषणाच्या सुरूवातीला आपल्या कवीमनाच्या गुलदस्त्यातून खुमासदार शैलीत उधळलेल्या प्रासंगिक विनोदांनी सगळ्यांचा उत्साह द्विगुणित केला.दरम्यान, डॉ. निवेदिता पवार यांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देत स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ निरामय शरीर ठेवत समाजदेखील सक्षम व निरामय बनविण्याचा प्रयत्न अविरतपणे करत रहावा, असा मौलिक सल्ला दिला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक ‘लोकमत’चे प्रतिनिधी विजय मोरे, अझहर शेख यांच्यासह पत्रकार आसिफ सय्यद, विजय गिते, प्रशांत कोतकर, संकेत शुक्ल, सय्यद चांदभाई, अजय भोसले, नवनाथ वाघचौरे, गणेश डेमसे, गौरव अहिरे, गौरव जोशी, अरुण मलाणी, रामदास नागवंशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. आवेश पलोड यांनी केले तर सुत्रसंचालन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांनी केले व आभार डॉ. किरण शिंदे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. दीपा जोशी, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. पंकज भदाणे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जीवन संजीवनी’चे प्रात्याक्षिकभुलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने ‘जीवन संजीवनी’ अर्थात सीपीआर प्रक्रियेचे प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले. तसेच काही पत्रकारांनीदेखील या प्रात्याक्षिकाचा अनुभव घेतला. गर्दीच्या ठिकाणी अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन किंवा मेंदूविकाराचा झटका येऊन एखादी व्यक्ती कोसळल्यास त्याच्या हृदयावर सतत नऊ ते दहा मिनिटे विशिष्ट पध्दतीने दाब देऊन बंद पडलेली रक्तभिसरण प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रयत्न रुग्णवाहिका येईपर्यंत करत राहणे गरजेचे ठरते. कारण हा त्या रुग्णासाठीचा ‘गोल्डन टाईम’ असतो. हृदयाकडून मेंदूला अशास्थितीत रक्तपुरवठा पुर्ववत होऊ शकल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते, असे सोहंदानी यांनी यावेळी सांगितले. ही प्रक्रिया अपघातसमयी कोसळून जखमी झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीसाठीदेखील उपयुक्त ठरते. त्यामुळे अपघातात कोठेही मार लागल्यास रक्तस्त्राव होत असल्यास त्याची चिंता न बाळगता ‘सीपीआर’द्वारे जीवन संजीवनीचा प्रयत्न सर्वसामान्यांनी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यJournalistपत्रकारNashikनाशिकdoctorडॉक्टर