सटाणा : कोविडकाळात डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यासाठी सर्वात मोठा आधार ठरले . सुरुवातीला आदिवासी भाग म्हणून विरोध झाला, मात्र आज याच सेंटरमुळे अनेकांना जीवदान मिळाले . याचे सर्व श्रेय तेथे काम करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना जाते, असे गौरवोद्गार बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी काढले.
जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बांधलेल्या ७५ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले . तर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळा श्रीराम मंदिर सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच जिजाबाई पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जितेंद्र इंगळे=-पाटील , माजी जि.प. सदस्य प्रशांत बच्छाव , बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे , शेतकरीमित्र बिंदूशेठ शर्मा , विस्तार अधिकरी नितीन देशमुख आदी उपस्थित होते . कोरोनाकाळात विविध माध्यमातून समाजसेवा करणाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला . बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले.