शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:43 IST

जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी बाबींवर लक्ष

ठळक मुद्देकारभार अधिक लोकाभिमुख होणार ग्रामीण पोलीस दलाकडून संकेतस्थळाचे लोकार्पण

नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील ‘आय.एस.ओ’ मानांकन प्राप्त पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी बाबींवर लक्ष देत जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालये व पोलीस ठाण्यांनी या मानांकनासाठी दावा केला होता. त्यानुसार आयएसओ मानांकन समितीने पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेट देत निकषांनुसार पडताळणी केली. नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक कार्यालय मालेगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळवण उपविभाग, पेठ उपविभाग या चार कार्यालयांसह मालेगाव तालुका, शहर, येवला शहर, सिन्नर, देवळा, पेठ अशा सहा पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळविण्यास यश आले. याबद्दल महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयात पोलीस ठाणे प्रमुखांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक करपे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कारभार अधिक लोकाभिमुख होणारतसेच राज्यभरातील पोलीस प्रशासनाचा कारभार अधिकाधिक लोक ाभिमूख व्हावा, या उद्देशाने राज्याचे पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस कार्यालयांना संकेतस्थळ तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलाकडूनही नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे लोकार्पण या सोहळ्याप्रसंगी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावरून ग्रामीण पोलिसांची इत्यंभूत माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे