शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सन्मान, मार्गदर्शन कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:37 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार येथील तालुका कृषी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : शेतकरी समन्वय समिती गठित

मालेगाव : शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार येथील तालुका कृषी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.शेतकऱ्यांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांकडून राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणीसाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार चंद्रजित राजपूत हे आहेत तर समितीत सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये कृषी संलग्न तालुकास्तरीय सर्व विभागांच्या अधिकाºयांचा समावेश आहे. शेतकरी मार्गदर्शन कक्षाचा उद्देश उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमास तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, विश्वनाथ निकम, अनुरेखक कन्हय्यालाल ढोडरे, सुनील सोनवणे आदींसह मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते.शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षात कृषी अधिकारी डी.सी. शिंदे यांची जनसंपर्क व मार्गदर्शन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाला भेट देणाºया सर्व शेतकºयांच्या नोंदी ठेवण्यात येणार असून, त्यात त्यांच्या समस्या व अडचणीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुकास्तरीय समन्वय समिती दर तीन महिन्यांनी आढावा घेणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी