ब्राम्हणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अिहरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कालावधीत श्रीराम,राधाकृष्ण, विठ्ठल रु क्मिणी, मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, या सोहळ्यातील मिरवणुकीत विद्यालयाचे विद्यार्थी, व विद्यार्थीनी लेझीम पथक,टाळ पथकात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयात श्री.यशवंतराव महाराज यात्रोत्सव निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती, त्यातील अठरा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यशवंत कला अकॅडमी कडून मिळालेल्या स्मृती चिन्हांचे मविप्र चे उपसभापती राघो नाना अहिरे े,शालेय व्यवस्थापन समतिीचे दिलीपअहिरे , गोविंद अहिरे ,अशोक शिरोडे, निंबा अहिरे ,दीपक सुर्यवंशी, माजी सरपंच सुभाष अहिरे,माजी उपसरपंच गोटू पगार, अनिल खरे, हेमंत अहिरे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन बी.एस. सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार यु.एन.खरे यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:31 IST