शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:17 IST

मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली असून, आता हा बहुचर्चित प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास आला आहे. शासनाच्या अनुदानातून सर्वसामान्यांचे सात लाख रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

आडगाव : मागील वर्षी आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरदेखील आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागील वर्षी कामाला सुरुवात झाली असून, आता हा बहुचर्चित प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास आला आहे. शासनाच्या अनुदानातून सर्वसामान्यांचे सात लाख रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या ४४८ सदनिकांच्या अर्जविक्रीला सोमवार (दि.१६) पासून सुरुवात झाली असून, चार दिवसांत तब्बल ६९ अर्जविक्र ी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख १६ मे आहे. या सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ९ लाख ६० हजार रु पये अधिक जीएसटी इतकी आहे. या सदनिकांसाठी केंद्र शासनाचे १.५० लाख व राज्य शासनाचे १ लाख असे एकूण २.५० लाख अनुदान असून, ७ लाख ५ हजार रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सदनिकांची माहिती घेण्यासाठी अनेक जण प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेत आहेत. पण अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्य माणसाला रोजंदारी व नोकरीतून मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नातून महागाईच्या काळात दिवस काढणे कठीण झाले आहे.  पोटाला पीळ देऊन वाचवलेली अवघी काही रक्कम काहींच्या हाताशी आहे. बँकांमधूनही कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी असल्यामुळे व सात लाख रुपये काही दिवसांत जमा  करणे कठीण असल्याने हक्काचे  घर दिवास्वप्नच राहते की काय,अशी भावनादेखील काही नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे शासनाने सुलभ हप्त्याने बँकांमार्फत कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Homeघर