शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात ५० जण होम क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:56 IST

नाशिक : निफाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देसंपर्कातील व्यक्तींचा शोध : विविध उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निफाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना संसर्ग वाढल्यापासून राज्य आणि केंद्र सरकारने विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणांनी अनेक उपाययोजना केल्या तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणीदेखील केली.संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे अनेक दिवस जिल्'ात कोरोना रुग्ण नसताना २ दिवसांपूर्वी निफाडमधील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, या रुणाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तथापि ज्या गावातील हा युवक आहे त्या संपूर्ण गावातील रहिवाशांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे, मात्र जिल्हाधिकारी मांढरे यांनी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान, सदरचा रुग्ण असलेला युवक हा १२ मार्च रोजी अहमदनगर येथे कामानिमित्ताने गेला होता. त्यावेळी काही विदेशातून आलेल्या नागरिकांची त्याची भेट झाली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या मोबाइलच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.मुंबईच्या रेल्वे इगतपुरीत पार्कदेशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरात अनेक रेल्वे सध्या थांबलेल्या आहेत. मात्र सर्व रेल्वे त्याठिकाणी उभ्या करणे शक्य नसल्याने इगतपुरी पर्यंतच्या मार्गावर पार्किंगसाठी विविध स्टेशन्सवर त्या थांबवण्यात येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून अशाच प्रकारे गोरखपूर एक्स्प्रेस इगतपुरीला आणण्यात येत होती त्यावेळी अनेक नागरिकांना विशेषत: मजुरांना ही रेल्वे गोरखपूरपर्यंत जाणार असे वाटल्याने ते या रेल्वेत बसले होते, मात्र इगतपुरी येथे आल्यानंतर रेल्वे थांबल्याने ते रुळाच्या मार्गावरून उत्तर भारताकडे पायीच निघाले होते, परंतु त्यांना परत पाठविण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक