शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:30 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचा निर्णय : सेविका घरभेटी देणार

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे आरोग्य अंगणवाड्या बंद झाल्याने धोक्यात आले असून, यातील काही बालके कुपोषित असल्याने त्यांच्या उदरभरणाचा त्याचबरोबर औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील बालकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा यांनी अंगणवाडीतील बालकांना १५ मार्च ते १५ एप्रिल या काळात ताजा गरम आहार देण्याऐवजी घरपोच आहार देण्यात यावा त्यात पोषण आहाराची पाककृतीचा समावेश करण्यात यावा त्याचबरोबर या एक महिन्याच्या कालावधीत अंगणवाडी सेविकांनी नियमित गृहभेटी देऊन बालकांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. अंगणवाडीतील बालकांप्रमाणेच स्तनदा व गरोदर मातांनाही घरपोच नियमित पोषण आहार देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. आयुक्ताच्या या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्न सुटला आहे.कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताशहरी व ग्रामीण भागातील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अंगणवाडीत पोषण आहार व औषधोपचार केला जातो. या बालकांची नियमित आरोग्य तपासणी त्याचबरोबर वेळेवर पोषण आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांना अधिक समावेश असल्याने अंगणवाड्या बंद केल्याने त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्न