शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगडावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 15:11 IST

त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेउपाययोजना करण्यात येत आहे. दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांचा कुणी पर्यटन स्थळी दर्शन तर कुणी तीर्थक्षेत्र दर्शन अशा प्रत्येकाच्या पसंतीने भाविक पर्यटक जात असतात. तसे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रही आहे व पर्यटनस्थळदेखील आहे. येथील गड-किल्ले, निसर्ग रमणीय प्रेक्षणीय स्थळे असल्याने पर्यटक येथे दोन्हीही स्थळांचा आवर्जून लाभ घेतात. त्यामुळे शहर गजबजले आहे.सुट्ट्यांच्या कालावधीत देवदर्शन व पर्यटनाचे नियोजन आखून सहकुटुंब भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून, सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.या पर्यटकांमुळे हॉटेल व्यावसायिक, पेट्रोलपंप, लॉजिंग, बोर्डिंग व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळी सण संपला असून, सध्या सुट्ट्यांचा कालावधी सहकुटुंब मजेत घालविण्यासाठी गुजरात राज्यातून वणी मार्गे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सप्तशृंगगड, शिर्र्डी, शनि शिंगणापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर असे नियोजन गुजरात राज्यातील भाविकांचे असते. गुजरातमध्ये दिवाळीनिमित्त आठवडाभर व्यावसायिक, शैक्षणिक, चाकरमाने, मजूर, व्यापारी व तत्सम घटक रोजच्या नित्यक्र मातून वेळ काढत सण साजरा झाल्यानंतर देवदर्शन व पर्यटन करतात. खासगी वाहनांद्वारे इच्छितस्थळी जाण्याकरिता ते अग्रक्र म देतात. त्यामुळे सापुतारा-वणी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. ही सर्व वाहने अल्पोपाहार, भोजन, विश्रांतीसाठी हॉटेल्स परिसरात थांबत असल्याने हॉटेल व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे. दरम्यान, ज्याप्रमाणे गुजरात राज्यातील नागरिक पर्यटन व देववर्शनासाठी महाराष्ट्रात येतात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नगर, नाशिक भागातील नागरिकही गुजरात राज्यातील पर्यटन स्थळे पाहण्याकरिता जातात. त्यामुळे वणी-सापुतारा, वणी-नाशिक, वणी- पिंपळगाव या राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. राज्य क्र मांक १७ व राज्य क्र मांक २३ यांना यात्रेचे स्वरूप आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक