निफाड : केंद्र सरकारने शेतकरी हिताचे तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ३ कृषी विधेयक मंजूर केले परंतु राज्याच्या आघाडी सरकारने सदरचे कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही असा आदेश काढला. या आदेशाचा निषेध करण्यासाठी निफाड तालुका भाजपा व महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा, रयत क्र ांती संघटना यांच्या वतीने बुधवारी निफाड तहसीलसमोर आदेशाची होळी करण्यात आली.यानंतर निफाडच्या नायब तहसिलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे केंद्राने शेतकऱ्यांच्या हितासाठी मंजूर केलेले कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही असा आदेश राज्याच्या आघाडी सरकारने काढला सदर काढलेला आदेश या आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा व शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी निफाड पंचायत समितीचे उपसभापती संजय शेवाळे, किसान मोर्चाचे सरचिटणीस बापूसाहेब पाटील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैकुंठ पाटील, रयत क्र ांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, माजी तालुकाध्यक्ष संजय वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण निकम, संजय गाजरे, प्रशांत घोडके, अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, सार्थक गाजरे आदी उपस्थित होते.
कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू होणार नसलेल्या आघाडी सरकारने काढलेल्या आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:12 IST
निफाड : केंद्र सरकारने शेतकरी हिताचे तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ३ कृषी विधेयक मंजूर केले परंतु राज्याच्या आघाडी सरकारने ...
कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू होणार नसलेल्या आघाडी सरकारने काढलेल्या आदेशाची होळी
ठळक मुद्देनिफाडच्या नायब तहसिलदार कल्पना निकुंभ यांना तालुका भाजपच्या निवेदन सादर