शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वीजदेयकांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:42 IST

नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देप्रस्तावित वाढीला विरोध उद्योजकांकडून मागण्यांचे निवेदन सादर

नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली.महावितरण कंपनीने महाराष्टÑ राज्य नियामक आयोगास वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सकाळी विद्युत भवन येथे निमा, आयमा, लघु उद्योग भारती, महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, स्टाइश- सिन्नर व शेतकरी संघटनांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत व महावितरणचा निषेध करत वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी महावितरण नाशिक परिमंडलचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्याशी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदनही दिले. स्थिर आकार लागू करून महावितरण छुपी दरवाढ करत आहे. शासनाची फसवणूक करून महावितरण चुकीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करत आहे.या आंदोलनात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, महाराष्टÑ चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आयमा अध्यक्ष वरुण तलवार, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, ग्राहक पंचायतीचे अरुण भार्गवे, दत्ता शेळके, सुधीर कारकर, धनंजय बेळे, शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, नितीन रोटे पाटील, राजेंद्र आहिरे, सुदर्शन डोंगरे, आर. एम. पवार, जे. आर. वाघ, सुधीर बडगुजर, विरल ठक्कर, रवींद्र झोपे, राजेंद्र कोठावदे, जयेश महाले, दीपक जाधव, जयंत पवार, सिद्धार्थ सोनी, विलास देवळे, उदय रकिबे, संजय महाजन, संदीप भदाणे, किरण वाजे आदी सहभागी झाले होते.महागडी वीजखासगी कंपन्याकडून महागडी वीज खरेदी करू नये, शेतकऱ्यांना चुकीचे वीज बिल देऊ नये, शहर-जिल्ह्यातील ग्राहकांना मागणीनुसार वीजमीटर उपलब्ध करून देण्यात यावे, सरासरी बिल न देता मीटर रिडिंग घेऊन बिल देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.४विविध संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करत व महावितरणचा निषेध करत वीज बिलाची होळी करण्यात आली.

टॅग्स :electricityवीजbillबिल