लोकमत न्यूजनेटवर्कअंदरसुल : गाव परिसरात बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.सर्जाराजाच्या बळावर आजवर शेती व्यवसाय होता, मात्र यांत्रिकिकरण आणि चारा-पाण्याची कमतरता यामुळे पशुधन कमी झाले आहे. मात्र आजही सर्वसामान्य गरीब शेतकरी देखील किमान दोन बैल ठेवतात. या वर्षी पूर्वभागात पाऊस बरा झाल्याने पिके उत्तम आहेत. अती पावसाने काही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. कांदा रोपे सडली तर काही ठिकाणी मका, मूग यांचे नुकसान झाले. त्यातच कोरोनाचे संकट यामुळे मात्र बैल पोळा सण साध्या पध्दतीने साजरा केला गेला.सणाच्या पार्श्वभूमीवर अंदरसुल येथे दोन दिवस बैलाचा साज व इतर साहित्य खरेदीसाठी बळीराजाने मोठी गर्दी केली होती. परंपरेप्रमाणे बैलांना विविध रंगाने रंगवून साज चढवून, शिंगे सजवून फुगे बांधून येथील वैजापूर वेश व कमान वेश या दोन्ही ठिकाणी बैल आणली गेली. बैलांची पूजा करून पुरण पोळीचा नैवेद्य दिला गेला.
अंदरसुल परिसरात साध्या पध्दतीने पोळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:32 IST
अंदरसुल : गाव परिसरात बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
अंदरसुल परिसरात साध्या पध्दतीने पोळा साजरा
ठळक मुद्देबैलांची पूजा करून पुरण पोळीचा नैवेद्य दिला गेला.