नाशिक : रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने रिक्षाचालकासह दोघा संशयितांनी एकावर वार केल्याची घटना गुरुवारी (दि़.२७) रात्रीच्या सुमारास भद्रकालीतील बडी दर्गा परिसरात घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली परिसरातील रहिवासी आसिफ शेख हे रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी जात होते़ यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षास त्यांनी बाजूला घेण्यास सांगितले़ या गोष्टीचा राग येऊन रिक्षाचालक संशयित शिंदे, संतोष दाते व बग्गा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांनी शिवीगाळ करून हातातील बादली शेख यांच्या डोक्यात मारली तर दुसऱ्या संशयिताने हातातील धारदार शस्त्राने पाठीवर वार केले व तिघेही फरार झाले़
एकावर हत्त्याराने वार
By admin | Updated: April 29, 2017 21:20 IST