पंचवटी : हनुमानवाडीत राहणाऱ्या घनश्याम नथू सैंदाणे (३८) या इसमाने राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.सैंदाणे यांनी सकाळी साडेसहा वाजता घरात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याचे लक्षात येताच त्यांचे वडील नथू सैंदाणे यांनी त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सैंदाणे यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. (वार्ताहर)