शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

हिरावाडी : भाजीबाजारातून महिलेची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 14:54 IST

एका दुचाकीवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने गुंजाळ यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका देत ओरबाडून पलायन केले. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा आता सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारांकडे मोर्चा वळविला आहे.

ठळक मुद्देमहिलांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक :  हिरावाडी भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहक महिलेची सुमारे तीन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पोबारा केल्याची घटना सोमवारी (दि.१२) सकाळी घडल्याने संताप व्यक्त होत आहे.हिरावाडी-अमृतधाम लिंकरोडकडे जाणाऱ्या वरदविनायक मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी सुमन अशोक गुंजाळ (५५,रा.गोपाळनगर) यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्या वरदविनायक मंदिर परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्याच वेळेस एका दुचाकीवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने गुंजाळ यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका देत ओरबाडून पलायन केले. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा आता सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारांकडे मोर्चा वळविला आहे. पालेभाज्या, फळभाज्या खरेदी करताना गृहिणींकडून अधिक बारकाईने तपासून खरेदी करण्यावर भर दिला जातो. यामुळे गृहिणींचे संपूर्ण लक्ष समोरील पालेभाज्या, फळभाज्या निवडण्यावर असते. त्याचाच फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवित असल्याचा प्रकार पुन्हा घडू लागला आहे. सोमवारी सोनसाखळी चोरीची घटना घडल्यानंतर गुंजाळ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी परिसरातील गस्ती पथकांना बिनतारी संदेशावरून घटनेची माहिती देत दुचाकी चोर व दुचाकीचे वर्णन कळविले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरीRobberyचोरी