शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

हिंदुत्व घ्या विकत, नरेंद्र मोदी मोफत!

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

नमो इफेक्ट : बाजारपेठेत मोदींवरील चरित्र ग्रंथमालिका सुरूच

नाशिक : केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ होऊन सव्वा दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मोदी नावाची जादू अजूनही जनमानसात कायम असून, मोदींचे चरित्रगान गाणाऱ्या ग्रंथांचा ओघ बाजारात सुरूच आहे. नाशकात भरलेल्या एका ग्रंथप्रदर्शनात सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ पुस्तक खरेदीवर नरेंद्र मोदींचे पुस्तक मोफत देण्याची योजना राबविली जात आहे, तर मोदींवरील अन्य ग्रंथांनाही वाचकांकडून चांगली मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत घोंघावत आलेल्या मोदी नावाच्या चक्रीवादळात मोठ-मोठे वृक्ष उन्मळून पडले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडियात मोदीपुराण सुरू असतानाच मोदींचे गुणगान गाणारे चरित्रपर ग्रंथ बाजारात दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही या ग्रंथांना बाजारात चांगली मागणी आहे. सत्तारूढ झाल्यानंतर मोदी सरकारने काही कटू निर्णय घेतल्याने जनमानसात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या; परंतु मोदी इफेक्ट अजूनही ओसरलेला नसल्याचे त्यांच्यावरील ग्रंथविक्रीतून दिसून येत आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयात सुरू असलेल्या ग्रंथप्रदर्शनात विक्रेत्याने मोदी इफेक्ट ‘कॅश’ करण्याची योजना आखली आहे. ‘एक पुस्तक विकत, एक पुस्तक मोफत’ या योजनेत सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथावर डॉ. रविकांत पागनीस व शशिकला उपाध्ये लिखित ‘नरेंद्र मोदी एक आश्वासक नेतृत्त्व’ हे पुस्तक मोफत दिले जात आहे. हेच पुस्तक संदीप वासलेकरांच्या ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकावरदेखील मोफत आहे. मोदींचा करिश्मा ‘कॅश’ करण्यासाठी काही लेखकही पुढे सरसावले आहेत. सध्या बाजारात नरेंद्र मोदी यांच्या चरित्रावर आधारित प्रदीप पंडित लिखित ‘एक श्रेष्ठ भारत’, सुनील माळी अनुवादीत ‘कहानी नमोची’, डॉ. गिरीश दाबके लिखित ‘नरेंद्रायन’, कुमार पंकज लिखित ‘महानायक नरेंद्र मोदी’, विनिता कुबेर लिखित ‘मोदीनामा’ तसेच शरद कुंटे लिखित ‘विकास पुरुष नरेंद्र मोदी’ आदि पुस्तके उपलब्ध आहेत. मोदींच्या चरित्रपर या ग्रंथांना वाचकांकडून चांगली मागणी असल्याचे अक्षरधारा प्रकाशनच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)