शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला होणार हिलस्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:23 IST

नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ : वीस कोटींच्या निधीची मागणी; आवश्यकता भासल्यास पर्यटन विभागाकडून मदत घेऊ

नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यामध्ये घरकुल, रखडलेले जलसिंचन, वीजपुरवठा प्रलंबित प्रश्नांवर आढावा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल आढावा, पंतप्रधान घरकुल योजना, आदिवासी विकास योजनांबाबत आढावा यासह विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात येणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या काळात तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडलेले आहे. त्यात कलाग्राम, बोटक्लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची कामे आणि अपूर्ण काम आहेत त्यावर या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून, नाशिक विमानसेवेबाबत काही अडचणी आहेत त्यावरदेखील चर्चा केली जाईल. शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहासात काही गोष्टी आहेत. मात्र त्या गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला हवे. सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून, सतत काहीतरी बोलणे चांगले लक्षण नाही, दुसरेही पक्ष आहेत असे समजूनच वक्तव्य करणे महत्त्वाचे असून, काय बोलावे व काय नाही यासाठी प्रसंगी आपण सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करू, असेही भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :Hill State Peoples Democratic Partyहिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीNashikनाशिक