राज्यमार्ग ठरतोय जीवघेणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:39 PM2020-01-09T23:39:04+5:302020-01-09T23:39:19+5:30

दरेगाव : मनमाड - उमराणा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याच्या साइटपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पसरला आहे, तर साइडपट्ट्या ...

The highway is becoming fatal ... | राज्यमार्ग ठरतोय जीवघेणा...

राज्यमार्ग ठरतोय जीवघेणा...

Next
ठळक मुद्देझुडपांचा विळखा : डांबरीकरण केलेला मनमाड-उमराणा रस्ता जागोजागी उखडला

दरेगाव : मनमाड - उमराणा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याच्या साइटपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पसरला आहे, तर साइडपट्ट्या खोलवर खचल्याने अपघातात वाढ होत आहे. नव्याने झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, डांबरीकरण केलेला रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
राज्यमार्गाच्या रस्त्याच्या कडेला गवत व झाडाझुडपांचा विळखा साइडपट्ट्या तीन ते साडेतीन फूट खोलीपर्यंत खचल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहने क्रॉस करताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक वैतागून गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे खड्डे तसेच साइडपट्ट्या भरून घेण्याचे काम झालेले नाही. या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते सदर ठेकेदार निकृष्ट काम करून मोकळे झाले. प्रवाशांकडून या रस्त्याबाबत निकृष्ट दर्जाचे असलेल्या कामाची चर्चा होती. परंतु या ठिकाणी संबंधित अधिकारी फिरकले नसल्याने प्रवासी व स्थानिक परिसरातील रहिवासी सांगतात. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याचे चित्र दिसत होते; मात्र दोन महिन्यातच रस्त्यावर खड्डे कसे पडले, असा प्रश्न वाहनधारक व शेतकरी उपस्थित करीत आहेत.
उमराणा येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून, या रस्त्याने दिवसभरात हजारो संख्येने वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याला ठिकठिकाणी पूल असल्याने त्यांना संरक्षण भिंत नाही, काही पुलाना दोन्ही बाजूला संरक्षण भिंती बांधल्या; परंतु पुलाच्या मध्यभागीच संरक्षण भिंत नसल्याने येथून जनावरे व दुचाकीस्वार पुलावरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात रानमळा येथील पुलाजवळ रस्त्याला वळण असून, दोन महिन्यापूर्वी ठेकेदाराने या रस्त्यांची दुरुस्ती केली. पण साइटपट्ट्या काही ठिकाणी सोडल्या तर भरण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला. पावसाने पूर्णपणे माती वाहून गेल्याने साइटपट्ट्या खचल्या आहेत. याच ठिकाणी साइट पट्ट्याअभावी तालुक्यातील एसटी कर्मचारी यांना आपला जीव गमवावा लागला. डोणगाव गावालगत असलेल्या बंडीगलगत साइटपट्टी पूर्ण खचली तर दरेगाव येथील गावालगत असलेल्या नदीच्या मोरीचा साइटचा पट्टा खचल्याने चारचाकी वाहने क्रॉस करताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमाराला रोजच्या रोज घटना घडत असल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शेतकºयांना आपला शेतमाल विकण्यासाठी मनमाड व उमरणा व इतर कृषी उत्पन्न बाजार समितीत न्यावा लागत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध होतो. मात्र कामे दर्जेदार होत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याबाबत तातडीने लक्ष घालून रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी नामको बँक संचालक सुभाष नहार, शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.

रात्रीचा प्रवास करणे धोकादायक
मनमाड - उमराणा हा राज्यमार्ग ग्रामीण भागातून गेलेला असल्याने या मार्गावर मोठी रहदारी असते. या मार्गावरून रात्रीचा प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. या राज्यमार्गावरून सप्तशृंगगड, अंतापूर येथील दावल मलिक बाबा व जैन धर्मीयांचे तीर्थस्थान मांगीतुंगी येथे महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. येथील एकशेआठ फुटी भगवान महावीर आदींसह धार्मिक स्थळे असल्याने मनमाड रेल्वे स्टेशन जंक्शनवरून भाविक भक्तांना देवळा उमराणा प्रवास करणे सोईचे होते तसेच गुजरात राज्यातून शिर्र्डीकडे येणाºया पायी भक्तांची कायमच (पालखी) या रस्त्यांने येत असतात.

यापूर्वी अनेकदा या रस्त्यावर झालेल्या अपघातात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्ता दुरु स्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यावर बºयाच ठिकाणी दिशादर्शक फलक गायब झाल्याने प्रवासी वर्गाची दिशाभूल होऊन अपघात घडत आहे.
- नथु देवरे, माजी सरपंच, दरेगाव

दोन महिन्यांपूर्वी मनमाड - उमराणा चौफुली येथे सदर ठेकेदाराला खड्डे बुजविणे व डांबरीकरण करताना मी स्वत: चौफुली येथील साइटपट्ट्याबाबत विचारणा केली असता मला सांगितले की, मनमाड ते दरेगाव या अंतरापर्यंत डांबरीकरण झाल्यानंतर साइटपट्ट्याला भर टाकून करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सदर संबंधित ठेकेदाराने कुठल्याही प्रकारे साइटपट्टे भरले नाही. यामध्ये कामाची सारवासारव करून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. याबाबत चौकशी करावी, असे मला वाटते.
- पुंजाराम गांगुर्डे, माजी सरपंच, दरेगाव

मनमाड-उमराणा, देवळा-सटाणा या राज्यमार्गावरून गुजरात राज्यात जाण्या-येण्यासाठी (शॉर्टकट) असून, शेतमाल, भाविक
भक्तांना हा रस्ता सोयीचा असल्याने याबाबत शासनाने या रस्त्यांची दुरु स्ती करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
- सुभाष नहार, नाशिक मर्चण्ट्स बॅँक संचालक, मनमाड

गुजरातमधून मनमाडकडे येणाºया व जाणाºया अवजड वाहनांची चांदवड तालुक्यातील दरेगाव ते देवळा तालुक्यादरम्यान
गिरणारे येथे डोंगराळ भाग (घाट) असल्याने अवजड वाहनांची दमछाक होते. यासाठी संबंधित अधिकाºयांनी याबाबत पाहणी करून उपाययोजना कराव्यात.
- सोमनाथ गांगुर्डे, पोलीसपाटील, दरेगाव, चांदवड

Web Title: The highway is becoming fatal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.