महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:22 PM2020-01-24T23:22:18+5:302020-01-25T00:12:13+5:30

शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.

Highway becomes a death trap! | महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

Next
ठळक मुद्देरस्ते अपघातात पंचवटी अग्रेसर : तारवालानगर चौफुली बनली धोकादायक

पंचवटी : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.
औरंगाबादरोड, जुना आडगावनाका, निमाणी बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी होत असली तरी त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातावर नियंत्रण कसे मिळविणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर चौफुलीवर होणाºया अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या चुकीमुळे अपघात घडले आहेत. अपघातावर नियंत्रण यावे म्हणून स्वयंचलित सिग्नल पाठोपाठ गतिरोधक बसविण्यात आले, परंतु त्याचाही फारसा उपयोग झालेला नसून, महिन्याभरात डझनपेक्षा जास्त अपघात तारवालानगर चौफुलीवर घडले आहेत.
या चौफुलीवर शहर वाहतूक पोलीस कर्मचारी हजर असेपर्यंत चालक वाहतूक नियम पालन करतात, त्यानंतर मात्र पुन्हा ‘जैसे थे’. मुंबई- आग्रा महामार्गावर गेल्या वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक सर्व्हिसरोडने वळविण्यात आली आहे, त्यात वेगाने जाण्याच्या प्रयत्नात चारचाकी एकमेकांना धडकून अपघात घडत असून, या रस्त्यावर अलीकडे दिवसाला एक अपघाती मृत्यू असे समीकरण तयार झाले आहे. अशीच परिस्थिती नाशिक-औरंगाबादरोडवर असून, या रस्त्यावर मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. त्यामुळे लग्नसराईत औरंगाबादनाका उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी होते. आडगाव नाका, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, निमाणी, हिरावाडी या चारही मुख्य रस्त्याला उपरस्ते येऊन मिळत असल्याने दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

सिग्नल यंत्रणा कुचकामी
मुख्य वाहतूक चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक वाहतूक रस्त्यावर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली असली तरी, ‘अतिघाई संकटात नेई’ याप्रमाणे चालक वेगाने जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने नेतात आणि त्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे चौफुलींवर कायम वाहतूक पोलीस नेमले पाहिजे, तर चौफुली सुरू होण्यापूर्वी किमान शंभर मीटर अंतरावर पुढे अपघात स्थळ आहे किंवा धोकादायक चौफुली असल्याने वाहने हळू चालवा, असे फलक लावणे गरजेचे आहे. पंचवटी परिसरातील मखमलाबादनाका, काट्या मारुती चौक, औरंगाबाद नाका, तारवालानगर, सेवाकुंज, पेठरोड बाजार समिती चौक भागात प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील अनेक सिग्नल बंद आहेत, तर अनेक सिग्नलवर वाहतूक पोलीस नसतात त्यामुळे सिग्नल नावपुरतेच असल्याचे बोलले जाते.

स्पीड हम्पद्वारे नियंत्रण
तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी गतिरोधक बसविले होते, मात्र गतिरोधकामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने सकाळी बसविलेले गतिरोधक काही तासांत काढून टाकण्यात आले होते. आता काही दिवसांपूर्वी पालिकेने स्पीड हम्प टाकले असले तरी या स्पीड हम्पवर अर्धवट पांढरे पट्टे मारलेले असल्याने ते वाहनधारकांना व्यवस्थित दिसत नाही त्यातच या स्पीड हम्पमुळे आणखी अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

Web Title: Highway becomes a death trap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.