शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवनात माणुसकीला सर्वोच्च स्थान : शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:04 IST

विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़

सिडको : विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़  प्रा. शेळके यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंग व अनुभवांचे दाखले देत त्यांच्यावर घरातूनच झालेले माणुसकीचे संस्कार त्यांना उंचीपर्यंत घेऊन गेल्याचे सांगितले़ माणसाची ओळख ही माणुसकीमुळेच होत असली तरी सद्यस्थितीत अल्पकालावधीत अती मिळविण्याच्या हव्यासापोटी माणुसकीचा हा झरा आटत चालला असल्याचे शेळके म्हणाले़  प्रारंभी वक्त्यांचा परिचय नंदकुमार दुसानिस यांनी करून दिला़ यावेळी अरविंद वाडिले, कृष्णराव बेधडे, विनय गुंजाळ, रमेश सोनवणे, व्ही. के. पवार, श्रीकांत सोनार, सुखदेव भामरे, देवीदास निकम, बाळकृष्ण गोळे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष किरण सोनार यांनी केल़े प्रास्ताविक देवराम सौंदाणे यांनी केले. प्रकाश काळे यांनी आभार मानले.भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरजकालौघात समाजात विभक्त कुटुंबपद्धती आकारास आली असून, कुटुंबातील संवादही दिवसेंदिवस हरपत चालला आहे़ फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियाची संवादासाठी आपल्याला गरज भासू लागली हेच माणूस माणसापासून दूर गेल्याचे चिन्ह आहे़ असंवेदनशीलता, असहिष्णुता यांबरोबरच कायिक व वाचिक हिंसेचे प्रमाणही वाढत चालले आहे़, ते पाहता संपूर्ण जगाला तथागत गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या अहिंसा तत्त्वाची गरज असल्याचे ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले़

टॅग्स :Nashikनाशिक