शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कमी खर्चात मिळते अधिक उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:11 IST

कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे.

सिडको : कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे. या तलावालगत असलेल्या मोकळ्या जागेवर अधिक मोठ्या आकाराचा तलाव उभारण्याची मागणी केली जात आहे.कामगारवस्ती असलेल्या सिडको भागात शिवसेना नगरसेवक मामा ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महापालिकेच्या निधीतून गेल्या पंधरा वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद जलतरण तलाव उभारला आहे. या तलावात पोहणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पंधरा वर्षांपूर्वीची सिडकोची लोकसंख्या व आजची लोकसंख्या यात दुपट्टीने वाढ झाली असल्याने या तलावात पोहणाºयांची गर्दी होत आहे. गेल्या रविवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास एक तरुण तलावात पोहत असताना पाण्यात खोलवर बुडत जात असल्याचे जीवरक्षक वाळू नवले व संजय पाटील यांच्या लक्षात आल्याने त्या तरुणास वाचविण्यात दोघा जीवरक्षकांनी वाचविले. परंतु असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मनपानेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. तलावालगतच मनपाची मोकळी जागा असून, याठिकाणी मोठ्या आकाराचा तलाव उभारणे गरजेचे आहे. यामुळे सध्या असलेल्या तलावाचा वापर हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ठेवत नवीन जागेत जलतरणपटूंसाठी पोहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जीवरक्षक म्हणून काम करीत आहे. या काळात हाउस म्हणून पोहण्यासाठी येणारे, पाण्यात बुडण्याचे प्रकार कायम घडत असतात. तलावात पोहणाºयांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून, तलावात प्रचंड गर्दी असल्याने नवीन पोहणारे पाण्यात बडू नये यासाठी बारीक लक्ष द्यावे लागते. तलाव हा लहान पडत असून, यासाठी मनपाने पर्याय खुला करण्याची गरज आहे.- वाळू नवले, जीवरक्षक,स्वामी विवेकानंद जलतरण तलाव  गेल्या पंधरावर्षांपूर्वी कमी खर्चात उभारलेल्या या तलावात पोहणाºयांची संख्या वाढली आहे. कामगार वसाहत असलेल्या सिडको भागात लहान मुलांसह जलतरणपटूंची राष्टय स्तरावर निवड होण्यासाठी मनपाने तलावालगत असलेल्या मोकळ्या जागेवर दुसरा तलाव उभारणे गरजेचे आहे.- मामा ठाकरे, माजी नगरसेवक ,  गर्दीमुळे अनेक अडचणी निर्माणतलावात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच युवक व महिलांचीदेखील पोहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे अडचणी निर्माण होत आहे. यातच सध्या लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर सुरू असल्याने शिकण्यासाठी येणाºया मुलांना अधिक वेळ देता येत नाही. तसेच तलावात अधिक गर्दी होत असल्याने एखादा मुलगा अथवा तरुण हा पाण्यात बुडत असल्यास त्याकडे लक्ष देणे कठीण होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwimmingपोहणे