शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकमास समाप्तीनिमित्त भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:04 IST

दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणाऱ्या अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे अखेरचा पर्व साधण्यासाठी गोदावरी घाट, कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. पाण्याचे आवर्तन सोडल्याने सध्या गंगेला भरपूर पाणी असून, भाविक रामकुंडासह विविध ठिकाणी गंगास्नानाचा आनंद घेत आहे.

नाशिक : दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणाऱ्या अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे अखेरचा पर्व साधण्यासाठी गोदावरी घाट, कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. पाण्याचे आवर्तन सोडल्याने सध्या गंगेला भरपूर पाणी असून, भाविक रामकुंडासह विविध ठिकाणी गंगास्नानाचा आनंद घेत आहे. स्नानानंतर गंगेला दिवा अर्पण करणे, देवदर्शन करणे, देवाला अधिकाचे वाण देणे आदींवर भर दिला जात आहे. भाचा, लेक-जावई यांना अधिकाचे दान दिल्यानंतर आता लेकी-सुनांची मातृपूजनासाठी लगबग पहायला मिळते आहे. आपल्या आईला अधिकाचे वाण देणे, तिची भेटवस्तू देऊन पूजा केली जात आहे. आईच्या पाद्यपूजनाला या काळात महत्त्व असते. त्यामुळे आपल्या लाडक्या आईसाठी साडी, इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लेकी-सुनांची लगबग पहायला मिळत आहे. अधिकाचा अखेरचा पर्व साधण्यासाठी भाविकांची लगबग असून, अनारसे, बत्तासे, आंबे, कपडे, सोने चांदी, तांबे आदींच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. पाऊस सुरू होण्याआधी अधिकाचे निमित्त करीत मांडे-आंबारस जेवणाचीही मेजवानी साधली जात आहे. बुधवारपासून (दि.१६ मे) अधिकमास सुरू झाला होता. बुधवारी (दि.१३) अमावास्या असल्यानेही शहरातील राज्यभरातून भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  त्यातच एसटी महामंडळाचा संप मिटल्याने, बससेवा सुरळीत सुरू झाल्याने आणि शाळा सुरू होण्यास दोन दिवस बाकी असल्याने भाविकांनी ‘अधिक’ साधण्यासाठी तीर्थस्थळांकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही नियोजन केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक