शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST

नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.

ठळक मुद्दे‘आकांक्षा’पुढती गगन ठेंगणे : आधारतीर्थ आश्रमातील आकांक्षा पवारने मिळविले यश

धनंजय रिसोडकर।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.आकांक्षाचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळानजीकचे टोळी हे होते. मात्र, आकांक्षा २ वर्षांची असतानाच तिचे वडील दिनेश पवार यांनी सावकार आणि बॅँकेच्या कर्जाच्या दबावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ आईने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याने आकांक्षा बालपणीच अनाथ झाली होती. अशा परिस्थितीत जवळचे नातेवाईक तिला सांभाळायला फारसे उत्सुक नसल्याने गावच्या सरपंचांनी आकांक्षाला त्र्यंबकेश्वरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आधारतीर्थ आश्रमात आणून सोडले होते. तेव्हापासून आधारतीर्थ आश्रमातच आकांक्षाचे पालनपोषण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांचे गुणसप्तकत्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील आहेत. त्यातील यंदा दहावीत असलेली ही सातही मुले राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून, त्यांनी मिळवलेले गुण आणि जिल्हा पुढीलप्रमाणे- आकांक्षा पवार (८४.५० टक्के, जळगाव), विद्या महाले (७९ टक्के ), चेतन फौजदार (७०.६० टक्के, अहमदनगर), बाळकृष्ण घारे (६८.६० टक्के, ठाणे), यशोदा चौधरी (६३ टक्के, औरंगाबाद), ओमकार लांडगे (६०.६० टक्के, सोलापूर), सुनीता डबके (५३.२० टक्के, यवतमाळ) शाळेपर्यंत पायी प्रवासत्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या आधारतीर्थमधील सर्व मुले तळवाडे गावातील जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आधारतीर्थपासून हे अंतर ५ किलोमीटर लांब असून, दररोज सर्व मुले हे अंतर चालत जातात. या मुलांप्रमाणेच आकांक्षानेही शाळेत पायी जात यश मिळविले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी