गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत भूमाफियांच्या संघटीत टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या सचिन मंडलिक याने त्याच्या साथीदारांसमवेत रमेश मंडलिक यांच्या हत्येचा कट रचला होता. या टोळीने नियोजनबद्धरीत्या आनंदवली येथे फेब्रुवारी महिन्यात शेतमळ्यात नेहमीप्रमाणे विहिरीतील पाण्याचा वीज पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या रमेश वाळु मंडलिक (७०) यांची धारधार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्याच्या तपासात पाण्डेय यांनी वैयक्तिक लक्ष घालत धागेदोरे तपासले असता, हा गुन्हा संघटित टोळीकडून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या गुन्ह्यात पोलिसांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेल्या डझनभर संशयिताना बेड्या ठोकल्या. पाण्डेय यांनी या टोळीभोवती मकोकाचा फास आवळला आणि किंगपिन रम्मी राजपूत आणि वैभव भडांगे हा मसल व बाळासाहेब कोल्हे हा मनी पॉवर वापरून टोळी चालवित असल्याचे मकोका आदेशात म्हटले होते.
--इन्फो--
याचिकाकर्ताच निघाला टोळीला रसद पुरविणारा म्होरक्या
टोळीच्या आर्थिक फायदा साधण्यासाठी संशयित आरोपी याचिकाकर्ता बाळासाहेब कोल्हे हा टोळीचा मार्गदर्शक असून, जागा बळकविण्यासाठी हिंसाचार, धाकदपटशा, बळजबरी करून भूधारकांच्या जमिनीवर कब्जा करण्यात अग्रेसर राहत असून, टोळीला आर्थिक रसद पुरविणारा मुख्य सदस्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
--इन्फो--
अप्रत्यक्ष मदत देणाराही मकोकाच्या कारवाईस पात्र : उच्च न्यायालय
एखाद्या टोळीला अप्रत्यक्षरीत्या गुन्ह्यासाठी मदत करत गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्यांशी संबंध वापरत असेल तर त्याच्याविरुद्धही मकोका कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करता येऊ शकते, असेही उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान निकालात नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासातील कागदपत्रांचे अवलोकन करत कोल्हे याने केलेली याचिका फेटाळून लावली आहे.