शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लपून छपून गेले... परंतु सारे एकत्रच भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:23 IST

शुकवारचा दिवस....महापौरपदाची सारे इच्छुक उठले....आपापल्या कुटुंबीयांना सांगून मुंबईला निघाले खरे, परंतु पक्षातील अन्य कोणाला आणि विशेष करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या वारीविषयी कळणार नाही याची काळजी घेतली...कोणी कसे कोणी कसे परंतु सारेच मुंबईला गेले.

नाशिक : शुकवारचा दिवस....महापौरपदाची सारे इच्छुक उठले....आपापल्या कुटुंबीयांना सांगून मुंबईला निघाले खरे, परंतु पक्षातील अन्य कोणाला आणि विशेष करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या वारीविषयी कळणार नाही याची काळजी घेतली...कोणी कसे कोणी कसे परंतु सारेच मुंबईला गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे गेले खरे परंतु त्यांनी साऱ्यांनाच दिलेली एक वेळ निघाली आणि गुपचूप आलेले सारेच एकत्र भेटले...मला न कळविता कसे येथे आलात कसे हं... पण मीही उस्ताद, आलोच ना येथे तुम्हाला शोधत असेच साऱ्यांच्या चेहेºयावर भाव होते आणि ते लपून राहिले नाही ! साºयांचे चेहेरे पाहण्याजोगे झाले होते.महापौरपदाची निवडणूक होण्याआधीच अनेक जण बाशिंग बांधून बसले आहेत. आज ना उद्या ती वेळ आली की, मग मैदानात उतरायचे अशी तयारीच सुरू होती. सातपूरचे अण्णा आधी विधानसभेसाठी इच्छुक होते. ती संधी गेली तरी त्यांनी मग महापौरपदावर दावा केला. त्यासाठी त्यांना म्हणे वरिष्ठांनीच शब्द दिला आणि मग ते गुमान पक्षाच्या कामाला लागले. असाच प्रकार पंचवटीच्या बाबांचा झाला. बाबाही पूर्व मतदारसंघासाठी दावेदार होते, त्यांनी त्यासाठी जंग जंग पछाडले आणि बाळासाहेबांचा पत्ता साफ करण्याची म्हणे व्यवस्था केली. परंतु दुर्दैव आड आले. पक्षाने आयात उमेदवाराला संधी दिलीराजकारणात सर्व काही खुले आमपणे करता येत नाही काही गोष्टी लपून छपून कराव्या लागतात. मग योग्यवेळी त्यांची उकल करायची असते. भाजपात असे घडलेही, परंतु लपून छपून गेलेले अण्णा, बाबा, नाना, दादा सारेच इच्छुक मुंबईत एका ठिकाणी एकत्र आले आणि मग कळले सारेच एका ठिकाणी आलेत आणि साºयांची पंचाईत झाली. मग त्यावर काय बोलणार साºयांनीच एकमेकांची विचारपूस केली आणि जाहीररीत्या कोणीच आपले पत्ते खुले केले नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारणBJPभाजपा