शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम! नाशिकमध्ये चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखालाही मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 14:40 IST

भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

ठळक मुद्देगणपती मूर्तीच्या मुखालाच चक्क मास्क गणरायाचे वाहन असलेल्या मूषकाला देखील मास्क

नाशिक :  थंडीत गणपती आणि अन्य देवांना स्वेटर घालण्याचे प्रकार अनेक शहरात किंवा जिल्ह्यात आढळतात. परंतु नाशिकमध्ये ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखाला मास्क लावण्यात आला आहे. नाशिकच्या लाडक्या नवश्या गणपतीला हा मास्क लावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर गणरायाचे वाहन असलेल्या मूषकाला देखील मास्क लावण्यात आला आहे.अर्थात, भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. नाशिक शहरात गंगापूर रोडवरील आनंदवल्ली जवळ गोदावरी नदीच्या काठावर नवश्या गणपती मंदिर आहे. नावाप्रमाणेच हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीकाठी असलेले हे देवस्थान पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. दररोज शेकडो भाविकांची मंदिरात हजेरी असते. मात्र, सध्या भाविकांची संख्या रोडावली आहे. कोरोनाची भीती वाटत असल्याने भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला असला तरी देवस्थान मात्र भाविकांचीच नव्हे तर विघ्नहर्त्या गणरायाची देखील काळजी घेत आहे. गणपती मूर्तीच्या मुखालाच चक्क मास्क लावण्यात आला आहे.

---भाविकांनी ‘कोरोना’सारख्या संसर्गजन्य आजारापासून स्वत:चा व इतरांचा बचाव करावा, हा संदेश यामाध्यमातून दिला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावूनच जावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी बागडताना सर्रासपणे थुंकणे टाळावे. जेणेकरून शहर कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे.- राजू जाधव, अध्यक्ष नवश्या गणपती मंदीर देवस्थान

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसganpatiगणपतीgodavariगोदावरी