शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहो, आश्चर्यम्! केवळ दोनच तास फुटले फटाके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:38 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झालेले असताना प्रदूषण मंडळाने कोणत्याही प्रकारची तक्रार न केल्याने पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झालेले असताना प्रदूषण मंडळाने कोणत्याही प्रकारची तक्रार न केल्याने पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही़ त्यामुळे शहरात न्यायालयाने दिलेल्या वेळेतच फटाके वाजविण्यात आले की काय, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे़ दरम्यान यावर्षी फटाके विक्रीत निम्म्याने घट झाल्याने पर्यावरणप्रेमींना आनंद व्यक्त केला असून, शहरवासीयांचे आभार मानले आहेत़दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाºया ध्वनी व वायुप्रदूषणामुळे माणसांबरोबरच प्राण्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या दोन तासातच फटाके वाजविण्याची परवानगी दिली होती़ तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते़ या गुन्ह्यासाठी आर्थिक दंड तसेच कारावासाच्या शिक्षेची तरतूदही असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे़दिवाळीतील तीन प्रमुख दिवसांमध्ये तर रात्री, पहाटे तसेच दुपारीही फटाके वाजविले गेले़ मोठ्या आवाजाचे तसेच प्रदूषण करणाºया फटाक्यांवरील बंदीची अंमलबजावणी करणाºया प्रदूषण नियामक मंडळ, पोलीस व संबंधित यंत्रणा सक्षम नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके फोडणाºयावरील कारवाईबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारया निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची होती़ मात्र, न्यायालयात तीन तारखेला आदेश येऊनही सहा तारखेपर्यंत असा काही निर्णय झाल्याची माहिती या मंडळाला नव्हती़ तसेच त्यांनी आमच्याकडे कॉपी नसल्याचे सांगितले होते़ याबाबत तक्रार कुणाकडे, कोणी करायची याबाबतही पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम आहे़- जसबिर सिंग, सदस्य,  जिल्हा पर्यावरण समिती, नाशिक़

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी