शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी नदीपात्रांचा संकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:09 IST

नांदगाव : सन २००९ च्या महापुरात शहरात पाणी घुसून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या अनुभवाचा अद्यापही प्रशासनाने काहीही धडा घेतल्याचे ...

नांदगाव : सन २००९ च्या महापुरात शहरात पाणी घुसून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या अनुभवाचा अद्यापही प्रशासनाने काहीही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. शहरातील दोन्ही नद्यांमध्ये झालेली अतिक्रमणे आणि वनस्पती, गाळ, कचरा यामुळे संकोच झालेले पात्र याचा फटका पावसाळ्यात पुन्हा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शाकांबरी व लेंडी या दोन नद्यांच्या मध्ये शहर वसले आहे. २००९ मध्ये महापूर आल्याने शहरातले काही भाग बुडण्याचा धोकाही त्यातून निर्माण झाला होता. नदीकाठची पक्की बांधकामे व लोखंडी अँगल, पत्रे वापरून उभारलेली दुकाने पुराच्या पाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडली व वाहून गेली. त्यानंतर नदीलगतच्या अतिक्रमणांचा धोका यावर खूप चर्चा झाली. नवीन अतिक्रमणे होऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. परंतु २००९ नंतरच्या वर्षात अतिक्रमणे पुन्हा ह्यजैसे थेह्ण झाली.अतिक्रमणे होऊ न देणे ही प्रशासकीय बाब असली तरी राजकारणाच्या दृष्टीने मते मिळविण्याचा मार्ग म्हणून त्याकडे बघितले जाते. यामुळे तेवढ्यापुरता गाजावाजा होतो. गेल्या तीस वर्षांत मुख्याधिकारी सुधीर राऊत, भदाणे, तहसीलदार सुनील गाढे अशा काही अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली. परंतु, काही वर्षांत ती पूर्ववत झाली. एकीकडे पाऊस नाही. दुसरीकडे नद्या प्रवाहित होत नाहीत. म्हणून त्यांच्या पात्रांना नाल्याचे स्वरूप द्यायचे आणि एखाद्या पावसाने दमदार हजेरी लावली की ओरड करायची. अशा काळात पुराने विस्थापित झाले की, पुनर्वसनासाठी हाकाटी पिटायची, अशी अवस्था सध्या नांदगाव शहराची झाली आहे. पुराने विस्थापित झाल्याच्या तक्रारी एकीकडे तर त्यातून पूर नियंत्रण रेषेच्या नियमावरून होणारी चर्चा असा पाठशिवणीचा खेळ सध्या सुरू आहे.इन्फोपात्रांची सुरक्षितता ऐरणीवरनदीपात्रांमध्येच भर टाकून गिळंकृत होणाऱ्या नदीपात्रांची सुरक्षितता हा ऐरणीवरचा मुद्दा आहे. २००९ च्या पुरात वाहून गेलेल्या अतिक्रमणांच्या जागी सुंदर बाग झाली आहे. त्या बागेच्या रेलिंगवर लावलेले मोठ्ठे होर्डिंग्ज बागेचे सौंदर्य झाकून टाकतात. एका मुख्याधिकाऱ्याने होर्डिंग्ज लावण्यास बंदी केली तर त्याच्यावर राजकीय दबाव आणला गेल्याची बाब सर्वश्रुत आहे. या अनुषंगाने उपाययोजनांबाबतीत राजकीय पातळीवर मतभिन्नता असताना प्रशासन स्तरावर देखील पाटबंधारे विभाग व महसूल यंत्रणेत समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक