शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

स्वप्नपूर्ती... वीरपत्नी कॅप्टन गौरी महाडिक बनल्या ‘पायलट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 07:31 IST

पती मेजर प्रसाद महाडिक यांच्या शौर्यातून प्रेरणा

अझहर शेख

नाशिक :  भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या ७व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हे कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. त्यांच्या शाैर्यापासून प्रेरणा घेत वीरपत्नी गौरी महाडिक यांनीही भारतीय सैन्यदलात जाण्याचा निश्चय करत तो पूर्ण केला. 

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना गुरुवारी  दीक्षांत सोहळ्यात ‘आरपीएएएस विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले.  भारत-चीन सीमेवरील ‘आसाम हिल’ येथे टॅन्क तपासणी करताना झालेल्या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. यानंतर वीरपत्नी गौरी महाडिक यांनी सैन्यात भरती होऊन शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यांनी चेन्नईच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले, जेथे त्यांच्या पतीने प्रसाद महाडिक यांनी प्रशिक्षण घेतले होते. 

स्वप्न पूर्ण झाले n कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) मागील वर्षभरापासून महाडिक यांनी आधुनिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम प्रणालीअंतर्गत उड्डाणाचे धडे घेतले. n त्या सध्या कॅप्टन पदावर असून त्यांना गुरुवारी समारंभपूर्वक विंग्स प्रदान करून गौरविण्यात आले. सैन्याचा गणवेश धारण करून पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचे त्यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांना गहिवरून आले होते. n ड्रोन तसेच मानवविरहित लहान एअरक्राफ्टद्वारे सीमेवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. कॅट्समधून प्रथमच मागील वर्षभरापासून या ‘आरपीएएस’ प्रणालीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. n यावर्षी हा अभ्यासक्रम १८ अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. यामध्ये कॅफ्टन गौरी महाडिक यांच्यासह अन्य दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

मार्च २०२० साली त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकpilotवैमानिकIndian Armyभारतीय जवान